श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

15व्या रोजगार मेळाव्यात ईपीएफओने 976 नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दिली नियुक्तीपत्रे

Posted On: 26 APR 2025 4:33PM by PIB Mumbai

 

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आज देशभरातील 47 ठिकाणी आयोजित 15व्या रोजगार मेळ्यात भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलेल्या या कार्यक्रमात ईपीएफओसह विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रे वितरीत करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण भरती मोहिमेचा एक भाग म्हणून, ईपीएफओ आपले कार्यबल बळकट करण्यासाठी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे स्वागत करत आहे.  या नवीन कर्मचाऱ्यांमुळे देशातील  लाखो ग्राहकांना सामाजिक सुरक्षा सेवा कार्यक्षमतेने मिळतील याची सुनिश्चिती होणार आहे.

आज 345 लेखा अधिकारी/ अंमलबजावणी अधिकारी आणि 631  सामाजिक सुरक्षा सहाय्यकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

नवनियुक्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विमा लाभ प्रदान करण्याच्या ईपीएफओच्या ध्येयात योगदान देतील, जेणेकरून सरकारच्या मजबूत आणि समावेशक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाला पाठिंबा मिळेल.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या निर्देशांचे पालन करून ईपीएफओने नियमित भरती सुनिश्चित करण्यासाठी मुख्य कार्यालयात भरती विभाग स्थापन केला आहे आणि भरती दिनदर्शिका देखील विकसित केली आहे.

गेल्या एका वर्षात, ईपीएफओने  159 सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, 84  कनिष्ठ भाषांतर अधिकारी, 28  स्टेनोग्राफर, 2674  एसएसए आणि इतर पदांवर  भरती केली आहे. एपीएफसी , ईओ/ एओ,पीए आणि एएसओ ची भरती सुरू आहे.

रोजगार मेळा हा पंतप्रधानांच्या राष्ट्र उभारणीसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या आणि तरुणांना सक्षम करण्याच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. ईपीएफओचा सहभाग पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित भरती, सेवा वितरण वाढविण्यासाठी आधुनिक प्रक्रियांचा वापर करण्याच्या त्यांच्या कटीबद्धतेला  अधोरेखित करतो.

नवीन भरती झालेल्यांना iGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मद्वारे प्रशिक्षणाची सुविधा मिळेल, तसेच औपचारिक प्रशिक्षणामुळे त्यांना कौशल्ये वाढवण्यास आणि त्यांच्या भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास त्यांना सक्षम केले जाईल.

ईपीएफओ सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन करत आहे  आणि भारताच्या सामाजिक सुरक्षा चौकटीला अधिक उंचीवर नेणाऱ्या भविष्यासाठी सज्ज कार्यबलाला चालना देण्याचा आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करत आहे.

***

N.Chitale/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2124632) Visitor Counter : 15