आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक आरोग्य समन्यायाचा प्रमुख चालक म्हणून पारंपरिक औषधांवर प्रकाश टाकण्यासाठी जागतिक आरोग्य शिखर परिषद प्रादेशिक बैठक 2025 चे आयोजन


जागतिक आरोग्य शिखर परिषदेची प्रादेशिक बैठक ही पारंपरिक औषधांवरील जागतिक संवाद वाढवण्याची समयोचित संधी: केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव

Posted On: 23 APR 2025 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2025

 

25 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे होणारी जागतिक आरोग्य शिखर परिषद (डब्ल्यूएचएस) प्रादेशिक बैठक, पारंपरिक औषध प्रणालींच्या एकात्मिकतेवर आणि विस्तारावर विशेष लक्ष केंद्रित करून, जागतिक आरोग्य कार्यसूचीला आकार देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करण्यास सज्ज आहे. शिखर परिषदेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे "संतुलन साधणे: आरोग्य आणि कल्याणासाठी पारंपरिक औषधांचा वापर वाढवणे." हे सत्र, जे जागतिक पारंपरिक औषध क्षेत्रासाठी एक प्रमुख मैलाचा दगड म्हणून काम करण्याचे आश्वासन देते.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना, "डब्ल्यूएचएस प्रादेशिक बैठक ही पारंपरिक औषधांवरील जागतिक संवाद वाढवण्याची समयोचित संधी असून हे समर्पित सत्र समग्र आरोग्यामधील वाढत्या जागतिक स्वारस्याचे द्योतक असल्याचे नमूद केले. डिसेंबरमध्ये दिल्ली येथे आयोजित आणि डब्ल्यूएचओ -जीटीएमसी द्वारे जामनगर येथे आयोजित होणाऱ्या दुसऱ्या डब्ल्यूएचओ पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषदेची तयारी करत असताना, भारत हा जागतिक कल्याणासाठी आपल्या बांधिलकीवर दृढ आहे" याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

"आरोग्य समन्याय सुनिश्चित करण्यासाठी प्रवेशाचे प्रमाण वाढवणे" या प्रमुख संकल्पनेंतर्गत आयोजित केलेल्या डब्ल्यूएचएस प्रादेशिक बैठकीत मंत्री, आघाडीचे शास्त्रज्ञ, सीईओ, संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी आणि नागरी समाजातील हितधारकांना एकत्र आणून सर्वांसाठी आरोग्य साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण, समावेशक आणि शाश्वत मार्गांचा शोध घेतला जाईल. पारंपरिक औषधांवरील समर्पित सत्र हे विशेष महत्त्वाचे आहे, जे काळानुसार चाचणी घेतलेल्या पारंपरिक ज्ञानाला अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनासह एकत्रित करण्याच्या परिवर्तनात्मक क्षमतेचा वापर करण्याचा प्रयत्न करते.

पारंपरिक औषधांवरील सत्रात प्राचीन ज्ञानावर आधारित समग्र आरोग्य प्रणाली व्यक्ती-केंद्रित सेवेची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यास कशाप्रकारे मदतगार ठरून आरोग्य समन्यायात योगदान देऊ शकतात याचा धांडोळा घेतला जाईल. तांत्रिक नवोन्मेष, पुराव्यावर आधारित संशोधन आणि विकसित नियामक चौकटींचा वापर करून सुरक्षित आणि प्रभावी पारंपरिक औषध पद्धतींमध्ये सार्वत्रिक प्रवेश कसा वाढवायचा याचे तज्ञ परीक्षण करतील.

2-4 डिसेंबर 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या डब्ल्यूएचओ पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला हे सत्र विशेष प्रासंगिक आहे असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले."

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123964) Visitor Counter : 25
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil