भारतीय स्पर्धा आयोग
स्पर्धाविरोधी वर्तन केल्याबद्दल यूएफओ मुव्हीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (त्याची उपकंपनी स्क्रेबल डिजिटल लिमिटेडसह) आणि क्यूब सिनेमा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड वर सीसीआय द्वारे आर्थिक आणि बिगर-आर्थिक निर्बंध
Posted On:
16 APR 2025 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2025
भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) स्पर्धा अधिनियम, 2002 (अधिनियम) च्या कलम 27 मधील तरतुदींनुसार दिनांक 16.04.2025 रोजी एक आदेश पारित केला असून, त्याद्वारे यूएफओ मुव्हीज इंडिया प्रायव्हेट (यूएफओ मुव्हीज), स्क्रॅबल डिजिटल लिमिटेड आणि क्यूब सिनेमा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (क्यूबीई) यांच्यावर आर्थिक आणि बिगर-आर्थिक निर्बंध लादले. या कंपन्यांनी कायद्याच्या कलम 3(4) मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे टाय-इन व्यवस्था, विशेष पुरवठा करार आणि व्यवहारासाठी नकार हे पर्यवसान झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी, आयोगाने निश्चित केले की यूएफओ मुव्हीज आणि क्यूब हे भारतातील सिनेमा थिएटर मालकांना (सीटीओ) डिजिटल सिनेमा इनिशिएटिव्हज्-कम्प्लायंट डिजिटल सिनेमा इक्विपमेंट (डीसीआय-कम्प्लायंट डीसीई) भाडेतत्त्वावर / भाड्याने पुरवणारे संबंधित बाजारपेठेतील महत्वाचे पुरवठादार आहेत. आयोगाला असे आढळले की यूएफओ मुव्हीज आणि क्यूब ने सीटीओबरोबर केलेल्या भाडेकरारात सामग्रीच्या पुरवठ्यावर निर्बंध लादल्यामुळे, पोस्ट प्रॉडक्शन प्रोसेसिंग (पीपीपी) सेवा पुरणाऱ्या कंपन्यांसाठी अडथळे निर्माण झाले, तसेच डीसीआय-अनुपालन डीसीई धारण करणाऱ्या सीटीओचा मोठा समूह इतर कोणत्याही पुरवठादाराकडून सेवा घेण्यापासून रोखला गेला. आयोगाने यूएफओ मुव्हीज (त्याची उपकंपनी स्क्रेबल डिजिटल लिमिटेडसह) आणि क्यूब यांना कायद्याचे कलम 3(4) मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. कायद्याच्या कलम 27 मधील तरतुदींनुसार आयोगाने यूएफओ मुव्हीज आणि क्यूब यांना इतर पुरवठादारांच्या सामग्रीच्या पुरवठ्यावर निर्बंध लादणाऱ्या सीटीओबरोबर पुन्हा भाडेकरार न करण्याचे निर्देश दिले.
आयोगाने असे निर्देश दिले आहेत की सीटीओबरोबरच्या सध्याच्या भाडेकरारात अशा प्रकारे बदल करावेत, की यूएफओ मुव्हीज (आणि त्याच्या सहयोगी) आणि क्यूब व्यतिरिक्त इतर पुरवठादारांकडून होणार्या सामग्रीच्या पुरवठ्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत.
कायद्याच्या उल्लंघनाचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेऊन तसेच इतर कमी-अधिक त्रासदायक घटकांचे मूल्यमापन करून, आयोगाने यूएफओ मुव्हीज (त्याची उपकंपनी स्क्रेबल डिजिटल लिमिटेडसह) आणि क्यूब यांना अनुक्रमे 104.03 लाख रुपये आणि 165.8 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला.
2020 च्या प्रकरण क्रमांक 11 वरील आदेशाच्या सार्वजनिक आवृत्तीची प्रत सीसीआयच्या पुढील वेबसाइटवर उपलब्ध आहे: www.cci.gov.in
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122288)