दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘आंतरजोडणी बाबींवरील विद्यमान ट्राय नियमांचा आढावा’ यावरील ट्राय पूर्व-परामर्श पत्राबाबत टिप्पण्या स्वीकारण्यासाठी मुदतवाढ
Posted On:
16 APR 2025 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2025
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) 03 एप्रिल 2025 रोजी 'आंतरजोडणी बाबींवरील विद्यमान ट्राय नियमांचा आढावा' या विषयावर एक पूर्व-परामर्श पत्र प्रसिद्ध केले होते. पूर्व-परामर्श पत्रावर भागधारकांकडून सूचना/टिप्पण्या सादर करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली होती.
वरील पूर्व-परामर्श पत्रावर सूचना/टिप्पण्या सादर करण्यासाठी भागधारकांकडून मुदत वाढवण्यासाठी प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेऊन सूचना/टिप्पण्या सादर करण्याची अंतिम तारीख 23 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पण्या, शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, adv-nsl1@trai.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येतील.
कोणत्याही स्पष्टीकरणासाठी/माहितीसाठी, श्री समीर गुप्ता, सल्लागार (नेटवर्क्स, स्पेक्ट्रम आणि परवाना-I), ट्राय यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-20907752 वर संपर्क साधता येईल.
* * *
S.Patil/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122286)