संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाद्वारे मेघायन-25


हवामानशास्त्रीय आणि समुद्रशास्त्रीय परिसंवादाचे आयोजन

Posted On: 16 APR 2025 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2025

 

जागतिक हवामान संघटनेची (WMO) स्थापना आणि 2025 च्या जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून  14 एप्रिल 25 रोजी भारतीय नौदलाद्वारे मेघायन-25 हवामानशास्त्रीय आणि समुद्रशास्त्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील नौसेना भवनात आयोजित या परिसंवादाचे उद्घाटन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या हस्ते आभासी माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत तज्ज्ञ, उच्चपदस्थ नौदल अधिकारी, परदेशी अतिथी आणि हवामान आणि समुद्रशास्त्रीय क्षेत्रातील प्रमुख हितधारकांचा समावेश होता. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS), राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT), भारतीय हवाई दल, अंतराळ अनुप्रयोग केंद्र (SAC), इस्रो, अहमदाबाद, राष्ट्रीय सागरी संस्था (NMF) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (IIT-M) यासारख्या प्रमुख संस्थांनी या कार्यक्रमात भाग घेतला. या वर्षीच्या WMO दिनाची थीम - ‘Closing the Early Warning Gap Together’ अर्थात 'आगाऊ इशारा क्षणार्धात प्राप्त करणे' या यावर्षीच्या WMO दिनाच्या संकल्पनेशी सुसंगती साधत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

तांत्रिक कार्यक्रम दोन समृद्ध सत्रांमध्ये विभागला गेला होता, प्रत्येक सत्राचे सूत्रसंचालन अनुभवी विषय तज्ज्ञांनी केले. भारतीय नौदल अकादमी (INA) चे प्राचार्य आणि सर्वात वरिष्ठ हवामानशास्त्र अधिकारी रिअर ऍडमिरल जी रामबाबू यांनी आयोजित केलेल्या सत्रात सागरी हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्रातील अत्याधुनिक विकासाचे प्रदर्शन करणाऱ्या अंतर्दृष्टीपूर्ण सादरीकरणांची मालिका होती. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन कमोडोर एसएमयू अथर, कमोडोर (NE) यांनी केले, ज्यामध्ये हवामान अंदाजातील सांख्यिकीय दृष्टिकोनांवर लक्ष केंद्रित केले गेले. दोन्ही सत्रांचा शेवट उत्साहवर्धक प्रश्नोत्तरांसह झाला ज्यात  प्रेक्षकांचा सक्रीय सहभाग होता. या कार्यक्रमात "आगाऊ इशारा क्षणार्धात प्राप्त करणे: सागरी सुरक्षा आणि समन्वय वाढवणे" या विषयावर केंद्रित एक प्रभावी आणि विचारप्रवर्तक पॅनेल चर्चा देखील होती ज्यामध्ये सागरी सुरक्षा आणि तयारीसाठी एकात्मिक धोरणांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना एकत्र आणले गेले. या चर्चेचे सूत्रसंचालन एनएमएफचे महासंचालक व्हाईस ऍडमिरल प्रदीप चौहान (निवृत्त) यांनी कुशलतेने केले.

अंतिम सत्राचे अध्यक्षस्थान नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी भूषवले. या कार्यक्रमाला नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती, भारत सरकारचे मुख्य जलविज्ञानतज्ज्ञ व्हाईस ऍडमिरल लोचन सिंग पठानिया आणि अनुभवी हवामान अधिकारी उपस्थित होते. अहमदाबाद येथील एसएसीचे संचालक डॉ. निलेश देसाई हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते, तर आयएमडीचे महासंचालक आणि जागतिक हवामान संघटनेचे मानद उपाध्यक्ष डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी बीजभाषण केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे नौदलाच्या हवामानशास्त्रातील विशेषीकरणाचे प्रणेते, कमोडोर पीआय ओमेन (निवृत्त) यांचा सत्कार. नौदल समुद्रशास्त्र आणि हवामानशास्त्राचे 94 वर्षांचे तरुण पहिले प्रधान संचालक यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि काही मौल्यवान आठवणी आणि अनुभव प्रेक्षकांसोबत सामायिक केले.

भारतीय नौदलातील हवामानशास्त्रीय सेवांमध्ये सतत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना अनुसरून, भारतीय नौदल (MOSDAC-IN) वेब सेवा, नौदल समुद्रशास्त्र आणि हवामानशास्त्र संचालनालय (DNOM) आणि SAC यांच्या संयुक्त सहकार्याने हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्रीय उपग्रह डेटा संग्रह केंद्राचे डॉ. निलेश देसाई यांनी अधिकृत उदघाटन केले. MOSDAC-IN, हे वैयक्तिक नौदल हवामान कार्यालयांसाठी स्वतंत्र लॉग-इनसह सानुकूलित उपग्रह व्युत्पन्न हवामान उत्पादने प्रदान करते.

जवळजवळ 10 वर्षांच्या अंतरानंतर या परिसंवादात त्यांच्या व्यावसायिक हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्रीय जर्नलमध्ये अनुरूप बदल देखील झाले. “सागरमंथन” ची 10 वी आवृत्ती मेघायन 25 दरम्यान प्रकाशित करण्यात आली.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122248) Visitor Counter : 40
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil