नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
इरेडा द्वारे 2024-25 च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699 कोटी रुपयांचा कर पश्चात नफा जाहीर, एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी
Posted On:
15 APR 2025 7:53PM by PIB Mumbai
भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी त्यांचे ऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक अहवाल जाहीर केले आहेत, जे प्रमुख आर्थिक निर्देशकांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवितात. कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक पीएटी अर्थात कर पश्चात नफा 1,699 कोटी रुपये नोंदवला आहे. देशातील सर्वात मोठी केवळ हरित वित्त पुरवठा करणारी एनबीएफसी अर्थात बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून, इरेडा ने केवळ 15 दिवसांत त्यांचे लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करून पुन्हा एकदा उद्योग मानके प्रस्थापित केली आहेत. या लक्षणीय कामगिरीमुळे इरेडा ही केवळ 15 दिवसांत लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील पहिली कंपनी आणि पहिली सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (पीएसयू) ठरली आहे.
आज झालेल्या बैठकीत इरेडाच्या संचालक मंडळाने कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेतली आणि 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी ऑडिटेड स्टँडअलोन आणि एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली.
प्रमुख आर्थिक ठळक मुद्दे (स्वतंत्र) – आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25:
• करपश्चात नफा (पीएटी): ₹1,699 कोटी (↑36%)
• करपूर्व नफा (पीबीटी): ₹2,104 कोटी (↑25%)
• परिचालनाद्वारे महसूल: ₹6,742 कोटी (↑36%)
• निव्वळ मूल्य: ₹10,266 कोटी (↑20%)
• कर्ज खातेवही: ₹76,282 कोटी (↑28%)
निकालांवर भाष्य करताना, इरेडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणाले, "इरेडाची महसूल, नफा आणि कर्जखातेवहीतील सातत्यपूर्ण वाढ भारताच्या नवीकरणीय ऊर्जा महत्त्वाकांक्षांना वित्तपुरवठा करण्याच्या दिशेने आमचा धोरणात्मक दृष्टिकोन अधोरेखित करते." नाविन्यपूर्ण आर्थिक उपाय आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणाला सक्षम बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."
हा मैलाचा टप्पा साध्य करण्यासाठी टीम आयआरईडीएच्या अतुलनीय समर्पण आणि उत्कृष्टतेची दास यांनी प्रशंसा केली.
***
S.Kane/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121982)
Visitor Counter : 29