अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून 75.6 कोटी रुपये किंमतीचे 7.56 किलोग्रॅम कोकेन केले जप्त, एकाला अटक
Posted On:
15 APR 2025 4:50PM by PIB Mumbai
अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरु असलेल्या महत्त्वपूर्ण कारवाई दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14.04.2024 रोजी दुबईहून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाला अटक केली.
या प्रवासी महिलेच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात पाच रिकाम्या हँडबॅग्ज/पर्स आढळून आल्या. या पाच बॅगांचे आतील कप्पे कापले असता त्यातून 75.6 कोटी रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची पावडर असलेली 7.56 किलोग्रॅम वजनाची 10 पाकिटे लपवलेली आढळली, चाचणीअंती ते कोकेन असल्याचे उघड झाले.
अटक केलेल्या व्यक्तीला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. अंमली पदार्थांचा स्रोत शोधण्यासाठी आणि तस्करीच्या कारवाईत सहभागी असलेल्या संभाव्य नेटवर्कची ओळख पटविण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय पुढील तपास करत आहे.
***
S.Kane/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121907)