सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
मार्च 2025 या महिन्यासाठी आधार वर्ष 2012 = 100 नुसार ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक
Posted On:
15 APR 2025 4:00PM by PIB Mumbai
ठळक वैशिष्ट्ये:
1. मार्च 2025 महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) वर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर मार्च 2024 च्या तुलनेत 3.34% (तात्पुरता) आहे. फेब्रुवारी 2025 च्या तुलनेत मार्च 2025 च्या प्रमुख चलनवाढ दरात 27 बेसिस पॉइंट्सची घट झाली आहे. ऑगस्ट 2019 नंतरचा हा सर्वात कमी वार्षिक चलनवाढीचा दर आहे.

2. खाद्यान्न चलनवाढ दर : मार्च 2024 च्या तुलनेत मार्च 2025 या महिन्यात अखिल भारतीय ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (सीएफपीआय) वर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर 2.69 % (तात्पुरता) राहिला. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी चलनवाढीचा दर अनुक्रमे 2.82% आणि 2.48% आहे. मार्च 2025 मधील खाद्यान्न चलनवाढ दर नोव्हेंबर 2021 नंतर सर्वात कमी राहिला.

3. मार्च 2025 मध्ये भाजीपाला, अंडी, डाळी आणि उत्पादने, मांस आणि मासे, तृणधान्ये आणि उत्पादने आणि दूध आणि उत्पादनांच्या चलनवाढ दरांमध्ये घट झाल्याने मार्च 2025 मध्ये प्रमुख चलनवाढ आणि खाद्यान्न चलनवाढ दरांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
4. ग्रामीण चलनवाढ दर: मार्च 2025 मध्ये ग्रामीण क्षेत्रातील प्रमुख आणि खाद्यान्न चलनवाढ दरांमध्ये तीव्र घट दिसून आली. मार्च 2025 मध्ये प्रमुख चलनवाढ दर 3.25% (तात्पुरती) होता तर फेब्रुवारी 2025 मध्ये तोच 3.79% होता. ग्रामीण क्षेत्रातील सीएफपीआय आधारित खाद्यान्न चलनवाढ दर मार्च 2025 मध्ये 2.82% इतका नोंदवला गेला, जो फेब्रुवारी 2025 मध्ये 4.06% होता.
5. शहरी चलनवाढ दर : शहरी क्षेत्रातील प्रमुख चलनवाढ दरात फेब्रुवारी 2025 मधील 3.32% वरून मार्च 2025 मध्ये 3.43% (तात्पुरती) पर्यंत किरकोळ वाढ दिसून आली आहे. तथापि, खाद्यान्न चलनवाढ दरात फेब्रुवारी 2025 मधील 3.15% वरून मार्च 2025 मध्ये 2.48% पर्यंत लक्षणीय घट दिसून आली आहे.
6. गृहनिर्माण चलनवाढ दर: मार्च 2025 मध्ये वार्षिक गृहनिर्माण चलनवाढ दर 3.03% राहिला. फेब्रुवारी 2025 मध्ये संबंधित चलनवाढ दर 2.91% होता.
7. एप्रिल 2025 साठी सीपीआय जारी करण्याची पुढील तारीख 12 मे 2025 (सोमवार) आहे.
अधिक माहितीसाठी, कृपया www.cpi.mospi.gov.in किंवा esankhyiki.mospi.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
***
S.Kane/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121869)