संरक्षण मंत्रालय
आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे विशेष अभ्यागत दिनासह टायगर ट्रम्फ 2025 सरावाचा समारोप
Posted On:
12 APR 2025 9:30AM by PIB Mumbai
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) जलस्थल सराव टायगर ट्रम्फ 2025 च्या चौथ्या आवृत्तीचा समारोप 11 एप्रिल 25 रोजी काकीनाडा येथे विशेष अभ्यागत दिनासह झाला. या विशेष अभ्यागत दिनाला तामिळनाडू आणि पुडुचेरी नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, अमेरिकेचे महावाणिज्यदूत, अमेरिकेच्या नेव्ही स्ट्राइक ग्रुप फाइव्हचे कमांडर आणि 54 इन्फंट्री डिव्हिजनचे कमांडिंग डेप्युटी जनरल ऑफिसर यांच्यासह इतर वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.
विशेष अभ्यागत दिनानिमित्त काकीनाडाच्या किनाऱ्यावर आणि किनाऱ्याबाहेर जटिल प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यामध्ये स्टँडऑफ आणि हार्ड बीचिंग, एससी आणि एमआय-17 V5 हेलिकॉप्टरमधून विशेष ऑपरेशन्स फोर्सेसद्वारे स्लिथिंग ऑपरेशन्स, सी-130 विमानांचा सहभाग आणि भारतीय नौदल, भारतीय लष्कर , भारतीय हवाई दल, अमेरिकी नौदल, अमेरिकी लष्कर आणि यूएस मरीन कॉर्प्स यांच्या एकात्मिक हवाई प्रात्यक्षिकांचा समावेश होता.
या प्रात्यक्षिकांमधून भारत आणि अमेरिकेच्या सशस्त्र दलांमधील संयुक्त लढाऊ कवायती, संयुक्त कौशल्ये आणि आंतरपरिचालन क्षमता दिसून आली.
1 ते 11 एप्रिल 25 या कालावधीत आयोजित या सरावात एचएडीआर मोहिमेतील मौलिक प्रशिक्षण देण्यात आले आणि सहभागींना एकमेकांच्या क्षमता, तंत्रे आणि प्रक्रियांची ओळख करून देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, टायगर ट्रम्फ सराव पहिल्यांदा 2019 मध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्याचा मुख्य उद्देश लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट (LEMOA) अंतर्गत लॉजिस्टिक्स एक्सचेंजद्वारे परिचालन समन्वय मजबूत करणे आणि सैन्यांमधील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे हा होता.
या सरावाचा बंदर टप्पा 1ते 7 एप्रिल 25 या कालावधीत विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता. या टप्प्याची सुरुवात अमेरिकेच्या दूतावासाचे चार्ज डी'अफेअर्स जॉर्गन के. अँड्र्यूज आणि पूर्व नौदल कमांडचे मुख्यालय, चीफ ऑफ स्टाफ व्हाइस अॅडमिरल समीर सक्सेना यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभाने झाली. या टप्प्यातील उपक्रमांमध्ये प्री-सेल कॉन्फरन्स, वैद्यकीय, ड्रोन आणि अंतराळ अशा प्रमुख तंत्रज्ञानावरील विषय तज्ञांमधील देवाण-घेवाण यांचा समावेश होता. बंदर टप्प्यात क्रॉस-डेक भेटी, जहाजावरील सराव आणि मैत्रीपूर्ण क्रीडा सामने यांचा समावेश होता.
(3)VGTK.jpg)
4Z0G.jpg)
(4)L2TC.jpg)
FDD7.jpg)
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121303)
Visitor Counter : 36