वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवव्या जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेत केले बीजभाषण
भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणूकीसाठी अतुलनीय संधी : मंत्री पीयूष गोयल
Posted On:
11 APR 2025 7:52PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे नवव्या जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेत बीजभाषण केले. यावेळी त्यांनी जागतिक व्यापाराला नव्याने आकार देण्यासाठी विशेषतःअमेरिकेसारख्या विश्वासार्ह भागीदारांसह, भारतासमोर असलेल्या संधींवर प्रकाश टाकला.
भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून संबोधत गोयल म्हणाले, “भारताकडे मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. पुढील दोन ते अडीच दशकांत, 1.4 अब्ज भारतीयांच्या आकांक्षांमुळे भारत आठ पटीने वाढेल. यामुळे मोठ्या प्रमाणात देशांतर्गत मागणी निर्माण होईल आणि जागतिक स्तरावर तितक्याच मोठ्या प्रमाणात फायदे मिळू शकतात.”
भारताच्या व्यापार निर्णयांवर बाह्य दबावाबद्दलच्या चिंतेचे खंडन करताना मंत्री गोयल म्हणाले, “ असा कोणताही दबाव नाही. चीनबद्दल बोलताना गोयल यांनी सांगितले की, “भारत नेहमीच आपल्या राष्ट्रहिताला सर्वाधिक प्राधान्य देईल.’’
जागतिक व्यापार व्यवस्थेबद्दल मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “जगाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहता येत नाही. विकसित राष्ट्रे समृद्धीचा आनंद घेत असताना, त्यांना गाठण्यासाठी विकसनशील आणि कमी विकसित देशांना वेळ आणि पाठिंबा दिला पाहिजे. जागतिक व्यापार संघटनेने हे ओळखले पाहिजे आणि त्यानुसार विकास केला पाहिजे.”
भारत बहुपक्षीयतेसाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले. तथापि, जागतिक व्यापार संघटनेमध्ये सुधारणा घडून येणे आवश्यक आहेत.
जागतिक व्यापार संघटनेच्या तत्त्वांना भारताचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले, “भारत नेहमीच जागतिक व्यापार संघटनेच्या चौकटीत काम करेल. अमेरिका आणि युरोपियन संघासह आमचे द्विपक्षीय करार त्याच्या व्याप्तीतच काम करतात.”
मुक्त व्यापार करारांबद्दल, बोलताना मंत्री गोयल यांनी, कालमर्यादा महत्वाकांक्षी असल्या तरी, अंतिम मुदतीत करार पूर्ण करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय हिताशी तडजोड केली जाऊ शकत नाही. “प्रत्येक कृती न्याय्य, नि:ष्पक्ष आणि परस्परांना फायदेशीर असली पाहिजे,” असे ते म्हणाले.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121114)
Visitor Counter : 44