वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उदयोन्मुख व्यापार समस्यांवर मात करण्यासाठी संबंधितांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून  समर्पित 'जागतिक शुल्क  आणि व्यापार मदत केंद्र' कार्यान्वित

Posted On: 11 APR 2025 7:18PM by PIB Mumbai

 

वाणिज्य विभाग आणि विदेश व्यापार महासंचालनालय - डीजीएफटी जागतिक व्यापारातील घडामोडींवर विशेषतः शुल्कामधील  बदल, आयातीत वाढ आणि निर्यात-संबंधित आव्हानांच्या संदर्भात बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उदयोन्मुख व्यापार समस्या आणि विविध शुल्क आणि प्रति-शुल्क उपाययोजना लक्षात घेता  नवीन निर्यात संधी किंवा विशिष्ट देशांकडून किंवा उत्पादन क्षेत्रांकडून  आयात दबाव वाढू शकतो. असे बदल  अनुभवणाऱ्या निर्यातदारांना आणि आयातदारांना त्यांच्या सूचना सामायिक करण्यास आणि संभाव्य सहाय्यक उपाय सुचवण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.  या संदर्भात, डीजीएफटीने उदयोन्मुख व्यापार समस्यांवर मात करण्यासाठी संबंधितांना मदत करण्यासाठी एक समर्पित 'जागतिक शुल्क  आणि व्यापार मदत केंद्र' कार्यान्वित केले आहे.

'जागतिक शुल्क  आणि व्यापार मदत केंद्रआयात आणि निर्यात विषयक आव्हाने, आयातीमध्ये झालेली वाढ किंवा डंपिंग, एक्झिम क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स किंवा पुरवठा साखळीशी निगडित  आव्हाने, आर्थिक किंवा बँकिंग समस्या, नियामक किंवा अनुपालन समस्या आणि इतर समस्या किंवा सूचनांशी संबंधित समस्या हाताळेल . हे मदत केंद्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या इतर मंत्रालये/विभाग/एजन्सींशी संबंधित व्यापार-संबंधित समस्या देखील संकलित करेल आणि  त्यांची मदत  मिळविण्यासाठी आणि संभाव्य उपाय उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधेल.

निर्यात-आयात समुदाय डीजीएफटी संकेतस्थळावर  माहिती भरू  शकतो आणि मदत हवी असलेल्या  समस्यांशी संबंधित माहिती खालील टप्प्यानुसार सादर  करू शकतो –

  • DGFT वेबसाइट (https://dgft.gov.in) वर जा -- > सर्व्हिसेस  -- > DGFT हेल्पडेस्क सेवा
  • क्रिएट न्यू रिक्वेस्ट ’ आणि ‘ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड अँड इशूज ’  श्रेणी निवडा
  • योग्य उप-श्रेणी निवडा (आयात आव्हाने, निर्यात आव्हाने, आयात वाढ किंवा डंपिंग, एक्झिम क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स किंवा पुरवठा साखळी विषयक आव्हाने, नियामक आणि अनुपालन समस्या आणि इतर समस्या आणि सूचना), इतर संबंधित तपशील भरा आणि सबमिट करा.

अन्य पर्याय म्हणजे  dgftedi[at]nic[dot]in या ईमेल आयडीवर ‘‘ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड  हेल्पडेस्क’ या विषयाच्या शीर्षकासह  समस्या पाठवल्या जाऊ शकतात किंवा 1800-111-550 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात.

डीजीएफटी  हेल्पडेस्क सेवाअंतर्गत स्टेटस ट्रॅकर वापरून निपटारा  आणि प्रतिसादाची  स्थिती ट्रॅक केली जाऊ शकते. या तिकिटांची स्थिती अपडेट झाल्यावर ईमेल आणि एसएमएस देखील पाठवले जातील. व्यापार हितधारकांना या सहाय्यता  सुविधांचा योग्य वापर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे .

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121112)
Read this release in: English , Urdu , Hindi