संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारत – एमआय 17 व्ही 5 हेलिकॉप्टर्समधील इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटस व विमान आधुनिकीकरण साहित्यासाठी बीइएल सोबत 2,385 कोटी रुपयांचा करार

Posted On: 07 APR 2025 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 एप्रिल 2025

 

संरक्षण मंत्रालयाने बेंगळुरू इथल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीसोबत भारतीय हवाई दलासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटस व विमान आधुनिकीकरण साहित्य अधिग्रहीत करण्यासाठी  आणि पूरक साधनांसह  ते एमआय 17 व्ही 5 हेलिकॉप्टर्समध्ये बसविण्यासंदर्भात सुमारे 2,385.36 कोटी रुपयांचा करार केला आहे. (भारतीय-स्वदेशी संकल्पना, विकास व उत्पादन) खरेदी श्रेणी अंतर्गत करण्यात आलेल्या या करारावर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत 7 एप्रिल 2025 रोजी स्वाक्षरी करण्यात आली.

या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटसमुळे प्रतिकूल वातावरणात हेलिकॉप्टर्सची काम करत टिकून राहण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल. यातील बहुतांश सुटे भाग व उप जोडण्यांची निर्मिती स्वदेशी उत्पादकांकडून केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे एमएसएमइसह भारतीय इलेक्ट्रॉनिक्स व संबंधित उद्योगांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन व चालना मिळेल.  एमआय 17 व्ही 5 साठी बनवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटस हे स्वदेशी क्षमता विकसित करण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा असून मेक इन इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने देशाला आत्मनिर्भर बनवणारेआहेत.   

 

* * *

N.Chitale/S.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2119866) Visitor Counter : 37


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil