पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
Posted On:
05 APR 2025 9:53PM by PIB Mumbai
श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी (आयओटी ) आज कोलंबो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीलंका सरकारच्या सहकार्याने आयओटीसाठी 10,000 घरे, आरोग्य सुविधा, पवित्र स्थळ सीता एलिया मंदिर आणि इतर समुदाय विकास प्रकल्पांच्या बांधकामाला भारत सहयोग देईल अशी घोषणा मोदी यांनी केली.
एक्स वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
“भारतीय वंशाच्या तमिळ (आयओटी) नेत्यांसोबतची बैठक फलदायी ठरली. हा समुदाय 200 वर्षांहून अधिक काळ दोन्ही देशांमधील एक जिवंत सेतू आहे. श्रीलंका सरकारच्या सहकार्याने आयओटीसाठी 10,000 घरे, आरोग्य सुविधा, पवित्र स्थळ सीता एलिया मंदिर आणि इतर समुदाय विकास प्रकल्पांच्या बांधकामाला भारत सहयोग देईल.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119413)
Visitor Counter : 21
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam