महिला आणि बालविकास मंत्रालय
लहान वयातील बालकांची सर्वोत्तम देखभाल व शिक्षण यासाठी अंगणवाडी सेविकांची क्षमता वाढवणे हा पोषण ट्रॅकर ऍपचा उद्देश
Posted On:
02 APR 2025 3:31PM by PIB Mumbai
पोषणाला महत्त्व देतानाच अंगणवाडी केंद्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने पोषण भी पढाई भी (PBPB) हे अभियान 10 मे 2023 रोजी सुरू करण्यात आले.
या राष्ट्रीय अभियानाद्वारे सर्व 13.9 लाख अंगणवाडी सेविकांना 5 दिवसांचे वैयक्तिक प्रशिक्षण – 3 दिवसांचा पहिला टप्पा (2023-25) व 2 दिवसांचा दुसरा टप्पा (2025-26) देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी द्विस्तरीय प्रशिक्षण PBPB अंमलबजावणी प्रारुप वापरले जात आहे. पहिल्या टप्प्यात राज्य स्तरीय वरिष्ठ प्रशिक्षकांना (SLMTs) दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी सेविकांना 3 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यांकनाच्या साधनांचा समावेश आहे आणि यामध्ये खेळावर, कृतीवर आधारित शिक्षणावर भर देण्यात येईल.
PBPB अंतर्गत क्षमता बांधणीमुळे आधारशिला (तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची देखरेख व शिक्षण यातील राष्ट्रीय अभ्यासक्रम) आणि नवचेतना (जन्मापासून तीन वर्षांपर्यंतच्या बालकांच्या उत्तेजनेसाठी राष्ट्रीय आराखडा) या उपक्रमांच्या अंगणवाडी स्तरावर मातृभाषेतील अंमलबजावणीमध्ये मदत मिळेल. 27 मार्च 2025 पर्यंत पहिल्या टप्प्यात देशभरातील 36,424 SLMT ना व 4,20,360 अंगणवाडी सेविकांना पोषण भी पढाई भी कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 35,174 अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे.
PBPB च्या पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी पोषण भी पढाई भी अभियानाची ओळख, विकासाची क्षेत्रे व खेळ आधारित ECCE उपक्रम आणि आधारशीला उपक्रमानुसार साप्ताहिक व दैनंदिन वेळापत्रक तसेच नवचेतना उपक्रमानुसार गृहभेटी याबाबतच्या सत्रांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी पोषणविषयक सत्रांमध्ये सूक्ष्म पोषणमूल्ये कमतरतेवरील IYCF, SAM/MAM उपचार, आहारविषयक मार्गदर्शक सूचना, वाढ देखरेख, पालकांशी संवाद आणि सामाजिक एकीकरण इत्यादींचा समावेश होता. तिसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणात दिव्यांग समावेशन, जन्मापासूनच्या तीन उत्तेजना, बालकांचे मूल्यांकन व शिक्षणाचे परिणाम, गृह भेटी, गर्भसंस्कार, राज्यातील सर्वोत्तम पद्धती इत्यादींचा समावेश होता.
डिजिटल प्रशिक्षणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आधारशिलावर आधारित दैनंदिन शिक्षणविषयक सूचना सर्व अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ऍपच्या माध्यमातून देण्यात आल्या. यामध्ये दोन ECCE उपक्रम ध्वनीचित्रफिती आणि अंगणवाडी केंद्रात 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठीचे दैनंदिन उपक्रमांची थोडक्यात माहिती देणारा ध्वनी संदेश यांचा समावेश आहे. ही साधनसामग्री 44 आठवड्यांचा सुनियोजित अभ्यासक्रम, 36 आठवड्याचे कार्यशिक्षण, 8 आठवड्यांचे पुनरावलोकन व दृढीकरण यावर आधारित आहे. 230 पेक्षा अधिक ध्वनीचित्रफिती, 180 पेक्षा जास्त ध्वनी संदेश आणि 1000 पेक्षा जास्त कृती आधारित पीडीएफ या ऍपवर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत. त्यांचे अन्य भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम सध्या सुरू आहे.
महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली.
***
S.Patil/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118038)
Visitor Counter : 23