आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत अद्ययावत माहिती
Posted On:
01 APR 2025 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (एनएलइपी) हा राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) या प्रमुख छत्राखाली येणारा केंद्र सरकार पुरस्कृत उपक्रम आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशांतील विशिष्ट कार्यक्रम अंमलबजावणी योजनांच्या आधारे एनएचएम अंतर्गत उपक्रमांसाठी निधीचे वाटप केले जाते आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आवश्यकतेनुसार प्राधान्याने आणि त्यांच्या क्षमतेनुसार निधीचा वापर करायचा असतो. 2005 मध्ये प्रचलितता दर (PR) दर 10,000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी ठेवून भारताने राष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य केलं आहे.
2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट गाठण्याच्या तीन वर्षे आधी म्हणजेच 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यापर्यंत आणण्यासाठी केंद्र सरकारने 30 जानेवारी 2023 रोजी कुष्ठरोगासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (एनएसपी) आणि रूपरेषा (2023-2027) तयार केली. एनएलईपी अंतर्गत प्रमुख उपक्रम खालीलप्रमाणे आहेत:
- राष्ट्रीय धोरणात्मक योजना (एनएसपी) आणि रूपरेषा 2023-2027 आणि कुष्ठरोग्यांना सूक्ष्मजीवविरोधी प्रतिकार करता यावा यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे 30 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
- कुष्ठरुग्ण नियमितपणे आणि सुरुवातीच्या टप्प्यावर शोधले जावेत यासाठी आशा आणि आघाडीच्या कामगारांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागात रुग्ण शोध मोहीम (एलसीडीसी), सक्रिय रुग्ण शोधणे आणि नियमित देखरेख.
- राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रम याबरोबरच मुलांची (0-18 वर्षे वयोगटातील) कुष्ठरोग तपासणी एकत्रित केली जाते.
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या तपासणीसाठी व्यापक प्राथमिक आरोग्य सेवेच्या उपक्रमांबरोबरच कुष्ठरोग तपासणी केली जाते.
- जिल्हा रुग्णालये/वैद्यकीय महाविद्यालये/केंद्रीय कुष्ठरोग संस्थांमध्ये पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया (आरसीएस) केल्या जातात आणि आरसीएस उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णाला 12,000/- रुपये कल्याण भत्ता दिला जातो
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kane/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117267)
Visitor Counter : 46