रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएचएआयने 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे सर्वात मोठे इनव्हिट मुद्रीकरण केले पूर्ण

Posted On: 26 MAR 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2025

 

भारत सरकारच्या मुद्रीकरण कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी 2020 मध्ये एन एच एम आयने स्थापन केलेल्या नॅशनल हायवेज इन्फ्रा ट्रस्ट (एन एच आय टी) या पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट (InvIT)ने निधी उभारणीचा चौथा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, ज्याचे व्यवसाय मूल्य सुमारे 18,380 कोटी रुपये आहे, ज्यामुळे हा भारतीय रस्ते क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठा मुद्रीकरण व्यवहार ठरला आहे. या फेरीच्या पूर्णतेनंतर, चारही फेऱ्यांमध्ये प्राप्त झालेले एकूण मूल्य 46,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

या फेरीत, एन एच आय टी ने देशातील तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून सुमारे 8,340 कोटी रुपये युनिट भांडवल म्हणून यशस्वीरित्या उभारले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत कर्जदारांकडून 10,040 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. हा निधी राष्ट्रीय महामार्गाच्या पट्ट्यांचे अधिग्रहण करण्यासाठी वापरला जाईल- आंध्र प्रदेशातील अनकापल्ले – नरसनपेटा, गुंडुगोलानू – कोव्वुरू आणि चित्तूर – मल्लवरम पट्टे, उत्तर प्रदेश/उत्तराखंडमधील बरेली – सीतापूर आणि मुझफ्फरनगर – हरिद्वार पट्टे, गुजरातमधील गांधीधाम – मुंद्रा पट्टा आणि छत्तीसगडमधील रायपूर – बिलासपूर पट्टा यासाठी 17,738 कोटी रुपयांच्या सवलतीच्या मूल्यावर (97 कोटी रुपयांच्या प्रीमियमसह). गुंतवणूकदारांनी बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे प्रति युनिट रु. 133.50 च्या कट-ऑफ किमतीवर युनिट्सची सदस्यता घेतली, जी 31 डिसेंबर 2024 च्या एनएव्ही रु. 131.94 प्रति युनिट पेक्षा प्रीमियम मूल्य दर्शवते. 

या इश्यूला विद्यमान आणि नवीन गुंतवणूकदारांकडून जोरदार मागणी आली. ईपीएफओ, एल अँड टी पीएफ, राजस्थान राज्य विद्युत कर्मचारी पीएफ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पीएफ यासारख्या अनेक देशांतर्गत सेवानिवृत्ती/भविष्यनिर्वाह निधी; अ‍ॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्ससह विमा कंपन्या; एनएबीएफआयडी, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक यासारख्या बँका/वित्तीय संस्था; आणि निप्पॉन इंडिया, बडोदा बीएनपी परिबास, नुवामा आणि व्हाइट ओक कॅपिटल सारख्या म्युच्युअल/गुंतवणूक निधींनी या इश्यूमध्ये भाग घेतला. याव्यतिरिक्त, एनएचआयटीचे विद्यमान परदेशी गुंतवणूकदार, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्ड यांनी त्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत बुक बिल्डिंगमध्ये भाग घेतला.

या फेरीतील एक महत्त्वाची प्रगती म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफ ओ) 2,035 कोटी रुपयांचे सबस्क्रिप्शन घेतले आहे. एखाद्या InvIT मध्ये ईपीएफ ओ ची ही पहिलीच गुंतवणूक आहे. तसेच, एन एच एम आय ने त्याच किमतीत युनिट्सचा सुमारे 15% हिस्सा घेतला आहे.

या फेरीच्या पूर्णतेनंतर, एन एच आय टी कडे 12 राज्यांमध्ये पसरलेल्या 2,345 किमी एकूण लांबीच्या 26 ऑपरेटिंग टोल रस्त्यांचा (41 टोल प्लाझा) वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ 20 ते 30 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीकरिता असेल. 

 

* * *

S.Patil/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115550) Visitor Counter : 26


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi