रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने गर्दीच्या काळात अतिरिक्त डबे आणि विशेष गाड्यांसह प्रवासी क्षमता वाढवली

Posted On: 21 MAR 2025 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मार्च 2025

 

भारतीय रेल्वेवर वर्षभर गाड्यांची प्रवासी क्षमता एकसमान नसते, कमी गर्दीच्या आणि जास्त गर्दीच्या कालावधीनुसार ती बदलते. गर्दीच्या काळात, विशेषतः लोकप्रिय मार्गांवर गाड्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात तर कमी गर्दीच्या काळात आणि कमी लोकप्रिय मार्गांवर, क्षमतेचा कमी वापर होतो.

भारतीय रेल्वेवर धावणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचा कल पाहण्यासाठी नियमितपणे त्याचे निरीक्षण केले जाते आणि अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी, परिचालन व्यवहार्यता लक्षात घेऊन विद्यमान गाड्यांचा भार वाढवला जातो, विशेष गाड्या चालवल्या जातात, नवीन गाड्या सुरू केल्या जातात, विद्यमान गाड्यांची वारंवारता वाढवली जाते.

जनरल आणि नॉन-एसी स्लीपर कोच वापरणाऱ्या जास्तीत जास्त प्रवाशांना सामावून घेण्यासाठी  मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या रचनेबाबतच्या विद्यमान धोरणामध्ये 22 डब्यांच्या गाडीमध्ये 12 (बारा) जनरल क्लास आणि स्लीपर क्लास नॉन-एसी कोच आणि 8 (आठ) एसी-कोचची तरतूद आहे, ज्यामुळे जनरल आणि नॉन-एसी स्लीपर कोच वापरणाऱ्या प्रवाशांना अधिक जागा  उपलब्ध होते.

मेल/एक्सप्रेस गाड्यांव्यतिरिक्त, परवडणाऱ्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे अनारक्षित नॉन-एसी पॅसेंजर गाड्या / मेमू / ईएमयू देखील चालवते.

सध्या, रेल्वे सेवा चालविण्यासाठी सुमारे 79,000 डबे वापरले जात आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

श्रेणी

डब्यांची संख्या

जनरल आणि नॉन -एसी स्लीपर

56,000 (एकूण संख्येच्या 70%)

एसी कोचेस

23,000

एकूण

79,000

वेगवेगळ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी अतिरिक्त आसन  व्यवस्था निर्माण करण्यासाठी, विद्यमान गाड्यांमध्ये कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या आधारावर अतिरिक्त डबे देखील जोडले जातात. गेल्या दोन वर्षात कायमस्वरूपी जोडलेल्या अतिरिक्त डब्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

वर्ष

जोडण्यात आलेले अतिरिक्त डबे

2023-24

872

2024-25 (फेब्रु. 25 पर्यंत)

983

अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आसन व्यवस्था वाढवण्यासाठी,2024-25 या आर्थिक वर्षात,एलएचबी डब्यांसह चालणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुमारे 1,200  सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत. नॉन-एसी डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, रेल्वेने 17,000  जनरल क्लास/स्लीपर क्लास डबे  तयार करण्याची योजना आखली आहे.

विविध प्रकारच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त, भारतीय रेल्वे सण, सुट्ट्या इत्यादी काळात प्रवाशांच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी  विशेष गाड्या देखील चालवते. 2024 आणि 2025  (फेब्रुवारी 2025 पर्यंत) दरम्यान चालवण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

कार्यक्रम

रेल्वे फेऱ्यांची संख्या

प्रवासी संख्या

महाकुंभ-2025

17340

4.24 कोटी

दुर्गा पूजा / दीपावली / छठ, 2024

7990

1.1 कोटी

उन्हाळी सुट्टी,2024

12919

1.8 कोटी

होळी 2024

604

8.6 लाख

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती  दिली.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2113913) Visitor Counter : 31


Read this release in: English , Urdu , Hindi