सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
डेटा-व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉन
Posted On:
19 MAR 2025 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2025
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) मायजीओव्ही (MyGov) च्या सहयोगाने 25.2.2025 ते 31.03.2025 या कालावधीत 'इनोव्हेट विथ GoIStats' नावाचा डेटा व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉन आयोजित केला आहे. पदवी (यूजी)/ पदव्युत्तर (पीजी) पदवी/ पदविका अथवा समतुल्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, मान्यताप्राप्त आणि प्रमाणिकृत भारतीय विद्यापीठे,महाविद्यालये आणि संस्थांमध्ये सध्या प्रवेश घेतलेले संशोधन सहयोगी, अथवा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वरील पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
मंत्रालयाकडून तयार करण्यात येत असलेल्या डेटाबद्दल जागरूकता निर्माण करणे,आणि एआय / एमएल चा समावेश असू शकेल,अशा तंत्रज्ञानाचा वापर करून एखादे डेटा व्हिज्युअलायझेशन तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विश्लेषणासाठी डेटा चा वापर करायला विद्यार्थी आणि संशोधकांना प्रोत्साहित करणे, या उद्देशाने हे हॅकेथॉन आयोजित करण्यात आले आहे.
या व्हिज्युअलायझेशनमुळे संशोधक आणि धोरणकर्त्यांच्या पुढील वापरासाठी डेटामधून मिळालेल्या माहितीचा प्रसार होण्यासाठी सहाय्य होईल.
भारतातील विद्यार्थी आणि संशोधकांमध्ये डेटा साक्षरता आणि सांख्यिकी विश्लेषणाला प्रोत्साहन देण्यासाठी एमओएसपीआयने पुढील उपाययोजना केल्या आहेत:
i.मंत्रालयाद्वारे उपलब्ध होणारी अधिकृत आकडेवारी मंत्रालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाते आणि विद्यार्थी आणि संशोधकांच्या वापरासाठी मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलद्वारे प्रसारित केली जाते.
ii.'नॅशनल इंटर्नशिप इन ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स' कार्यक्रमांतर्गत मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठे/ संशोधन संस्थांमध्ये पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा पूर्ण केलेल्या किंवा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एमओएसपीआय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देते.
iii.मंत्रालयाच्या क्षमता विकास योजनेच्या अनुदान घटकांतर्गत आर्थिक सहाय्य देऊन एमओएसपीआय अधिकृत आकडेवारीतील संशोधनाला प्रोत्साहन देते.
iv.राष्ट्रीय सांख्यिकी प्रणाली प्रशिक्षण अकादमी (एनएसएसटीए) केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांच्या सांख्यिकी / अर्थशास्त्र / सामाजिक विज्ञान विभागातील विभागप्रमुख आणि यूजी / पीजी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत सांख्यिकीवरील एक आठवड्याचा जागरूकता कार्यक्रम आयोजित करते.
v.एनएसएसटीए विद्यापीठे / महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये सांख्यिकी / अर्थशास्त्र / सामाजिक विज्ञान विभागातील यूजी / पीजी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत सांख्यिकीवर एक दिवसीय जागरूकता कार्यशाळा आयोजित करते.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), राव इंद्रजीत सिंह यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113105)
Visitor Counter : 28