कृषी मंत्रालय
सेंद्रिय शेती वर राष्ट्रीय कार्यशाळा व प्रदर्शन
Posted On:
19 MAR 2025 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2025
राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्र ,गाझियाबाद ने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने गाझियाबाद इथल्या त्यांच्या परिसरात 18 ते 19 मार्च 2025 दरम्यान सर्व भागधारकांसाठी दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यशाळा व प्रदर्शन आयोजित केले आहे. सर्व भागधारकांनी एकत्र येऊन शाश्वत कृषी प्रणालींविषयी चर्चा करणे हे या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. कृषीसंबंधित धोरण निश्चितीसाठी उपयुक्त सूचना करण्यासाठी याची मदत होईल, तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करत त्याच्या तंत्रज्ञानविषयक प्राथमिक व अद्ययावत माहिती पुरवणे,मृदा गुणवत्ता, शाश्वत उत्पादन, मूल्यवर्धन व विपणनाविषयक माहिती पुरवण्यात देखील या कार्यशाळेची मदत होईल. कृषी विज्ञान केंद्रे(KVK) व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) वैज्ञानिकांसह इतर 200 भागधारक यात सहभागी होणार आहेत.
Jaydevi PS/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2112973)