संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत नेदरलँड्सच्या संरक्षणमंत्र्यांची घेतली भेट
दोन्ही देशांनी संरक्षण औद्योगिक सहकार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या शक्यतांचा घेतला मागोवा
Posted On:
18 MAR 2025 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 18 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीत नेदरलँड्सचे संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकेलमन्स यांच्याबरोबर बैठक घेतली. त्यांनी संरक्षण, सुरक्षा, माहिती देवाणघेवाण, हिंद प्रशांत क्षेत्र तसेच नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.
GEL0.JPG)
दोन्ही मंत्र्यांनी जहाजबांधणी, उपकरणे आणि अवकाश क्षेत्रातील सहकार्याच्या शक्यतांचा मागोवा घेतला तसेच दोन्ही देशांचे कौशल्य, तंत्रज्ञान आणि प्रमाणातील परस्पर पूरकता वाढवण्यासाठी चर्चा केली. त्यांनी संबंधित संरक्षण तंत्रज्ञान संशोधन संस्था आणि संघटनांनाशी संलग्नता ठेवण्याव्यतिरिक्त कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यावरही चर्चा केली.
बैठकीनंतर X या समाज माध्यमावर लिहिेलेल्या संदेशात संरक्षण मंत्री म्हणाले की भारत नेदरलँड्ससोबतची संरक्षण भागीदारी आणखी वाढवण्यासाठी उत्सुक आहे.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112369)
Visitor Counter : 35