संसदीय कामकाज मंत्रालय
राष्ट्रीय युवा संसद योजना 2.0 देशभरातील सर्व नागरिकांसाठी खुली
Posted On:
17 MAR 2025 8:00PM by PIB Mumbai
संसदीय कामकाज मंत्रालयाने राष्ट्रीय युवा संसद योजना (NYPS) वेब पोर्टलची अद्यतनित आवृत्ती आज सुरू केली. ही योजना एनवायपीएस 2.0 म्हणूनही ओळखली जाईल. एनवायपीएसची मागील आवृत्ती केवळ मान्यताप्राप्त संस्थांच्या विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित होती. या उलट, एनवायपीएस 2.0, आर्थिक स्थिती, लिंग, जात, पंथ, धर्म, वंश, प्रदेश आणि स्थान अशा कोणत्याही भेदभावाशिवाय देशभरातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
खालील मार्गांनी या पोर्टलवरचा सहभाग सुलभ केला जाऊ शकतो: -
i. संस्था सहभाग: सर्व शैक्षणिक संस्था पोर्टलवर उपलब्ध मार्गदर्शक तत्त्वांनुसार युवा संसद बैठकांचे आयोजन करून या श्रेणीत सहभागी होऊ शकतात. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना "किशोर सभा" या उप-श्रेणीसाठी निवडता येऊ शकते तर पदवीधर आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना "तरुण सभा" या उप-श्रेणीसाठी निवडता येते.
ii. गट सहभाग: पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार युवा संसद बैठकांचे आयोजन करून नागरिकांचा एक गट या श्रेणीत सहभागी होऊ शकतो.
iii. वैयक्तिक सहभाग: 'सक्रिय भारतीय लोकशाही' या विषयावरची प्रश्नमंजुषा सोडवून कुणीही नागरिक या श्रेणीत सहभागी होऊ शकतो.
Sl. No
|
Year
|
Total Registrations
|
-
|
2019-20
|
4369
|
-
|
2020-21
|
3579
|
-
|
2021-22
|
65
|
-
|
2022-23
|
2337
|
-
|
2023-24
|
1346
|
-
|
2024-25
|
7242 (as on date)
|
मंत्रालयाला वेळोवेळी विद्यार्थी आणि संस्थांकडून त्यांच्या समोरील आव्हाने आणि चिंतांबद्दल अभिप्राय मिळतो आणि त्यावर आवश्यक ती कारवाई केली जाते.
संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112032)
Visitor Counter : 20