संरक्षण मंत्रालय
9वी भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरण चर्चा नवी दिल्ली येथे संपन्न
Posted On:
17 MAR 2025 4:19PM by PIB Mumbai
भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरण चर्चेच्या नवव्या आवृत्तीचे आयोजन 17 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांनी केले, तर ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाचे नेतृत्व ऑस्ट्रेलिया संरक्षण विभागाच्या आंतरराष्ट्रीय धोरण विभागाचे प्रथम सहाय्यक सचिव बर्नार्ड फिलिप यांनी केले.
चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी संरक्षण सहकार्याच्या क्षेत्रात संरक्षण सराव आणि देवाणघेवाणीत झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे स्वागत केले. यामध्ये प्रमुख करारांना अंतिम स्वरूप आणि एकमेकांच्या प्रमुख संरक्षण व्यापार प्रदर्शनांमध्ये भागीदारी अशा अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांचा समावेश होता.
संवादात सागरी क्षेत्र जागरूकता, परस्पर माहितीचे आदानप्रदान, संरक्षण उद्योग आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य, तसेच एकत्रित सराव आणि देवाणघेवाण यासह एकमेकांच्या प्रदेशांमधून तैनाती यासंदर्भात चर्चा झाली. दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.
ऑस्ट्रेलियामध्ये 2025 मध्ये होणाऱ्या पुढील 2+2 मंत्रीस्तरीय संवादाच्या तयारीसाठी दोन्ही देशांनी आपले प्राधान्यक्रम निश्चित केले. तसेच, दोन्ही पंतप्रधानांनी भविष्याचा विचार करून ठरवलेल्या संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाच्या निर्मितीसाठी एकत्र काम करण्याची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. या सहकार्यामुळे दोन्ही देशांची सामूहिक ताकद वाढेल, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल आणि प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.
दोन्ही देशांनी संरक्षण उद्योगातील सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यावर भर दिला. संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी वेगाने पुढे नेण्यासाठी दोन्ही बाजूंनी संबंधित संस्थांना सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.
या चर्चेच्या निमित्ताने, ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला भेट देणार आहे.
15FH.JPG)

***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111940)