संरक्षण मंत्रालय
मॉरिशस राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी पोर्ट लुईस बंदरावर गेलेल्या आयएनएस इंफाळ या भारतीय जहाजाचा दौरा संपन्न
Posted On:
15 MAR 2025 7:04PM by PIB Mumbai
आयएनएस इंफाळ या भारतीय नौदलाच्या जहाजाने मॉरिशसचा बंदर दौरा पूर्ण केला आहे. 14 मार्च 2025 रोजी हे जहाज पोर्ट लुईस येथून निघाले आहे. 57व्या मॉरिशस राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी या जहाजाने हा दौरा केला. या समारंभात भारतीय नौदलाचे एक पथक, बँड आणि दोन एमएच 60आर हेलिकॉप्टर सहभागी झाले होते. या शानदार संचलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यावसायिक संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा सामने आणि सामुदायिक संपर्क उपक्रम या जहाजावर आयोजित करण्यात आले.
मॉरिशस राष्ट्रीय तटरक्षक दलाच्या (एनसीजी) कर्मचाऱ्यांना बंदर आणि सागरी देखरेख, व्हीबीएसएस (भेट, बोर्ड, शोध आणि जप्ती), सैन्य संरक्षण, जहाजावरील हेलिकॉप्टर मोहिमा, अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण अशा व्यावहारिक पैलूंविषयी जहाजावर प्रशिक्षण देण्यात आले. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी गयासिंह आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित केले होते.
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त 12 मार्च रोजी जहाज जनतेसाठी खुले करण्यात आले होते. यावेळी 1,300 हून अधिक पर्यटकांनी जहाजाला भेट दिली.
जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी मॉरिशस पोलिस आणि एनसीजी मुख्यालयासह पोर्ट लुईस येथील प्रमुख सुरक्षा आस्थापनांना भेट दिली.
जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन कमल के चौधरी यांनी मॉरिशस सरकार आणि मॉरिशस पोलिस दलाचे (एमपीएफ) प्रमुख मान्यवर आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
भारतीय उच्चायुक्तालयाच्या सहकार्याने जहाजाच्या डेकवर मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला मॉरिशसचे वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि स्थानिक राजनैतिक दलाचे सदस्य उपस्थित होते.
पोर्ट लुईसहून निघाल्यानंतर, आयएनएस इंफाळने भारतीय नौदल आणि मॉरिशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलातील समन्वय आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी, एमसीजीएस व्हिक्टरीसोबत द्विपक्षीय युद्ध सराव आणि संयुक्त ईईझेड निगरानी केली.
आयएनएस इंफाळच्या या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत द्विपक्षीय संबंधांना नवी चालना मिळाली आण हिंद महासागर क्षेत्रातील सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी 'प्रथम प्रतिसादकर्ता' तसेच 'प्राधान्यपूर्ण सुरक्षा भागीदार' म्हणून जलदगतीने कार्य करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी झाली.
(6)MUZ3.jpeg)
(7)P2OV.jpeg)
(4)9GLV.jpeg)
XW4B.jpeg)
***
S.Patil/P.Jambhekar/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111566)
Visitor Counter : 15