सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने होळी सणाच्या निमित्त लाखो कारागिरांना मजुरी वाढीची दिली भेट


1 एप्रिल 2025 पासून खादी कारागिरांच्या वेतनात 20 टक्के वाढ केली जाण्याची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केली घोषणा

Posted On: 12 MAR 2025 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2025

नवी दिल्लीतील भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) राजघाट येथील कार्यालयात मंगळवारी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी 2024-25 या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील कामगिरीची माहिती दिली.  तसेच, आयोगाने खादी कारागिरांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 एप्रिल 2025 पासून खादी कारागिरांच्या मजुरीमध्ये 20 टक्के वाढ करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. सध्या, कारागिरांना चरख्यावर कताईसाठी प्रति लड  12.50 रुपये दिले जातात, त्यात 1 एप्रिलपासून 2.50 रुपये वाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव दरानुसार,कारागिरांना आता प्रति लड कताईसाठी 15 रुपये मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात 'खादी क्रांती'ने कारागिरांच्या जीवनात व्यापक बदल घडवून आणला आहे, असे आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले. सरकारने कातकाम करणाऱ्या आणि विणकरांच्या उत्पन्नात अभूतपूर्व वाढ केली आहे, असेही ते म्हणाले.

  • 1 एप्रिल 2023 रोजी मजुरी 7.50 रुपयांवरून 10 रुपये प्रति लड करण्यात आली.
  • 17 सप्टेंबर 2024 रोजी ती 10 रुपयांवरून वाढवून 12.50 रुपये प्रति लड करण्यात आली.
  • 1 एप्रिल 2025 पासून ती 15 रुपयांपर्यंत वाढवण्यात येत आहे.
  • गेल्या 11 वर्षांत, मोदी सरकारने खादी कारागिरांच्या वेतनात 275% ची ऐतिहासिक वाढ केली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'खादी क्रांती'च्या प्रभावामुळे सुमारे 12.02 कोटी रुपयांच्या खादी उत्पादनांची ऐतिहासिक विक्री झाली.
  • विविध प्रदर्शनात 98 खादी आणि 54 ग्रामोद्योग स्टॉल लावण्यात आले होते, आणि त्यातून 9.76 कोटी रुपयांची खादी आणि 2.26 कोटी रुपयांची ग्रामोद्योग उत्पादने विकली गेली.

गेल्या 10 वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत ऐतिहासिक वाढ झाली आहे,अशी माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी दिली.

आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उत्पादन आणि विक्रीचा एक नवीन विक्रम स्थापित होईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या खादी क्रांतीच्या प्रभावामुळे,खादी केवळ एक कापड राहिले  नाही तर ग्रामीण भारताच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया बनली आहे” असेही ते म्हणाले.


S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2110973)
Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati