सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चांगला चित्रपट जनशिक्षणाचे एक माध्यम - वेन गेशे दोर्जी डामदुल


आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने दोन दिवसांचा बोधिपथ चित्रपट महोत्सव केला आयोजित

Posted On: 12 MAR 2025 11:26AM by PIB Mumbai

बुद्धाने 2500 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कला आणि चित्रे प्रकारांची सिनेमा या माध्यमाशी तुलना करत, तिबेट हाऊसचे संचालक वेन गेशे दोर्जी दामदुल यांनी बोधिपथ चित्रपट महोत्सवच्या उद्घाटन समारंभात सांगितले की, दृश्यकला नेहमीच जनतेसाठी शिक्षण आणि माहिती देणारे माध्यम राहिले आहे.

नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाद्वारे  आयोजित दोन दिवसीय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी वेन गेशे दामदुल यांनी सांगितले की, बुद्धांच्या काळात साक्यमुनींनी काही चित्रे बनवून घेतली होती, जी त्यांच्या शिकवणींचे दर्शन घडवून जनतेचे प्रबोधन करीत होती. मनुष्याची पाचही इंद्रिये कोणताही संदेश आत्मसात करण्यात  महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जर दृश्यकलेचा दर्जा खालावलेला असेल, तर समाज त्याच गोष्टी आत्मसात करेल. परिणामी, आज आपण मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी, विशेषतः सायबर गुन्हेगारीचा प्रादुर्भाव पाहतो. त्याचप्रमाणे, संघर्ष, युद्धे, हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्ती आणि अविश्वासाची स्थिती ही समाजात अधिकाधिक दिसून येईल, असेही त्यांनी नमूद केले.

प्रसिद्ध अमेरिकन बौद्ध लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ, तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रा. रॉबर्ट ए. एफ. थर्मन, ज्यांनी तिबेटी बौद्ध धर्मावर अनेक पुस्तके लिहिली, संपादित केली आणि अनुवादित केली आहेत, त्यांनी दिल्लीत अल्पकालीन भेटीदरम्यान या महोत्सवात सहभाग घेतला. आपल्या ‘मंजुश्री’ या प्रगतीपथावरील नवीन पुस्तकाविषयी त्यांनी माहिती सांगितली आणि श्रोत्यांना काही मनोरंजक किस्से तसेच वैयक्तिक अनुभव कथन करून मंत्रमुग्ध केले.

जगप्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्व आणि बौद्ध धर्माचे अनुयायी रिचर्ड गिअर, जे दिल्लीहून प्रवास करत असताना थोड्या वेळासाठी उपलब्ध होते, त्यांनी या महोत्सवासाठी विशेष संदेश पाठ्वला.  त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की, बौद्ध चित्रपट महोत्सव हा बुद्धांच्या शिकवणींचा प्रसार करण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. 
आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या ‘बोधिपथ फिल्म फेस्टिव्हल’च्या पहिल्या आवृत्तीत 10-11 मार्च 2025 दरम्यान चार परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादांमध्ये विविध पार्श्वभूमीतील मान्यवरांचा सहभाग होता – शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, समाज माध्यमावरील प्रभावशाली व्यक्ती तसेच अभिनेते यांचा त्यात समावेश होता.

***

SushamaK/GajendraD/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2110723) Visitor Counter : 39


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati