अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राधान्यक्रमांच्या क्षेत्रांना वर्ष 2019 मध्ये झालेल्या 23 लाख कोटींच्या एकूण कर्ज वितरणाच्या तुलनेत 85%ची वाढ नोंदवत वर्ष 2024 मध्ये हे कर्ज वितरण 42.7 लाख कोटींवर पोहोचले

Posted On: 11 MAR 2025 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2025

 

कृषी, एमएसएमई तसेच सामाजिक पायाभूत सुविधांसह सर्व प्राधान्यक्रम क्षेत्रांना बँकांतर्फे वर्ष 2019 मध्ये एकूण 23,01,567 कोटींचे कर्जवितरण करण्यात आले होते, त्यामध्ये 85%ची वाढ नोंदवत 2024 मध्ये या क्षेत्रांना दिल्या गेलेल्या एकूण कर्जाची रक्कम सहा वर्षांत 42,73,161 कोटीवर गेली आहे.

प्राधान्यक्रम क्षेत्राला झालेल्या एकंदर कर्जवितरणापैकी कृषी क्षेत्राने 2019 पासून 2024 पर्यंत कर्ज वितरणात स्थिर आणि सकारात्मक वाढ दर्शवली आहे. वर्ष 2019 मध्ये कृषी क्षेत्रात 8,86,791 कोटी रुपयांचे कर्जवितरण झाले होते तर 2024 पर्यंत त्यात लक्षणीय वाढ होत ही रक्कम 18,27,666 कोटी झाली आहे. (कृषी क्षेत्राच्या आकडेवारीत बँकांकडून कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी झालेल्या कर्ज वितरणाच्या रकमेचा समावेश आहे) एमएसएमई क्षेत्राला झालेल्या एकंदर कर्ज वितरणात देखील  वाढ झाली असून वर्ष 2019 मध्ये या क्षेत्राला 10,99,055 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत झाले होते तर 2024 मध्ये ही रक्कम 21,73,679 कोटी रुपयांपर्यंत वाढली.

देशातील बँकांची आर्थिक सुदृढता सुधारण्यासाठी तसेच कर्जविषयक शिस्त, जबाबदार कर्ज वितरण आणि सुधारित शासन, तंत्रज्ञानाचा स्वीकार, कर्जवसुली आणि अनुत्पादक मालमत्ता कमी करणे यांसारख्या विषयांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल ही माहिती दिली.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2110482) Visitor Counter : 18


Read this release in: English , Urdu , Hindi