सांस्कृतिक मंत्रालय
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार (एनएआय) या संस्थेने अभिलेख पटल संकेतस्थळावरून कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठीचे वापरकर्ता शुल्क कमी केले
Posted On:
11 MAR 2025 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2025
नॅशनल अर्काईव्ह्ज ऑफ इंडिया (एनएआय) म्हणजेच भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने जुन्या नोंदी सहजतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अभिलेख पटल (https://www.abhilekh-patal.in/jspui/) मंचावरुन कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या शुल्कात कपात केली आहे. (डिजीटाईज ऑन डिमांड पद्धतीसह)डिजिटल प्रतिमा पुरवण्यासाठी खालीलपणे शुल्क कमी केले आहे:
भारतीय अभ्यासकांसाठी कोणत्याही दस्तावेजातील पहिली 20 पाने मोफत डाऊनलोड करून मिळतील. त्यानंतर लागू होणाऱ्या शुल्काच्या स्लॉट्सचे तपशील खाली दिले आहेत:
1. 0-20 प्रतिमा- मोफत
2. 20-50 प्रतिमा – प्रत्येक प्रतिमेसाठी 2/- रुपये
3. 50-100 प्रतिमा - प्रत्येक प्रतिमेसाठी 3/- रुपये
4. 100 आणि त्यापेक्षा अधिक प्रतिमा - प्रत्येक प्रतिमेसाठी 5/- रुपये
परदेशी अभ्यासकांना कोणत्याही दस्तावेजातील पहिली 20 पाने मोफत डाऊनलोड करून मिळतील. त्यानंतर लागू होणाऱ्या शुल्काच्या स्लॉट्सचे तपशील खाली दिले आहेत:
1. 0-20 प्रतिमा– मोफत
2. 20-50 प्रतिमा - प्रत्येक प्रतिमेसाठी 5/- रुपये
3. 50-100 प्रतिमा - प्रत्येक प्रतिमेसाठी 10/- रुपये
4. 100 आणि त्यापेक्षा अधिक प्रतिमा- प्रत्येक प्रतिमेसाठी 15/- रुपये
डाउनलोड करण्यात आलेल्या प्रतिमांची संख्या जर पुढील स्लॉटइतकी झाली तर सर्व पानांसाठी त्याच स्लॉटचे दर लागू होतील. अतिमोठ्या आकाराच्या तसेच मोठ्या आकाराच्या नकाशांच्या/ दस्तावेजांच्या ए ते 0 आकारात स्कॅन केलेल्या प्रतिमांसाठी भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही संशोधकांना द्यावे लागणारे शुल्क 300 डीपीआय आकाराच्या प्रत्येक प्रतिमेमागे 20 रुपयांवरून कमी करून प्रत्येक प्रतिमेमागे 15 रुपये करण्यात आले आहे. किमान शुल्क रद्द करण्यात आले आहे.
भारतीय अभ्यासकांसाठी रेप्रोग्राफी सेवांचे दर (भौतिक स्वरूपातील प्रिंटआउट्स) दर पानामागे 5 रुपयांच्या ऐवजी 2 रुपये करण्यात आले असून परदेशी अभ्यासकांसाठी हेच दर 10 रुपये प्रती पान वरून आता 4 रुपये प्रती पान करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे, रंगीत पानाच्या फोटोकॉपीसाठी दर पानामागे भारतातील अभ्यासकांना द्यावे लागणारे 20 रुपयांचे शुल्क कमी करून 8 रुपये करण्यात आले असून परदेशी अभ्यासकांसाठी हेच शुल्क दर पानामागे 40 रुपये होते ते आता 16 रुपये करण्यात आले आहे.
एनएआयने संस्थेच्या सर्व नोंदींचे डिजिटलीकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून अभिलेख पटल या मंचावर सुमारे 8.81 कोटी पानांच्या अपलोडिंगचे काम पूर्ण झाले आहे. संस्थेकडे असलेले सर्व दस्तावेज जगात कोठूनही, कोणत्याही वेळी सहजतेने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येत्या दोन वर्षांत सर्व दस्तावेजांचे संपूर्ण डिजिटलीकरण करण्याचा एनएआयचा प्रयत्न आहे.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110259)
Visitor Counter : 23