कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भावी पिढ्यांसाठी अन्न सुरक्षा आणि जनुकीय संसाधने सुनिश्चित करण्यासाठी जनुक पेढी करणार स्थापन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Posted On: 05 MAR 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 04 मार्च 2025

देशातील  जनुक संसाधनांचे जतन करण्यासाठी जनुक पेढी (बँक) स्थापन केली जाईल,अशी घोषणा पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्प पश्चात दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित केलेल्या एका वेबिनारमधे  केली आहे. भावी पिढ्यांसाठी जनुक संसाधने आणि खाद्यान्न  सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

शासन,उद्योग, शिक्षण आणि नागरिक यांच्यातील साहचर्याला प्रोत्साहन देत परिवर्तनकारी अर्थसंकल्पीय घोषणांचे परिणामकारक उपाय योजनांमध्ये रूपांतर करण्यात मदत करणे हा या वेबिनारचा उद्देश आहे. नागरिकांचे सक्षमीकरण, अर्थव्यवस्थेचे सबलीकरण आणि नवकल्पनांचा विकास यावर लक्ष केंद्रित करून, चिरस्थायी आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दृढ करत ; तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील नेतृत्व; आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक कुशल, निरोगी कार्यबल कार्यरत करत यांचा पाया यातून रचला जाईल.वेबिनारच्या प्रमुख विषयांत  लोकांमधील गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष  यांचा समावेश आहे.

जनुक बँक हे बियाणे, परागकण किंवा ऊतींचे नमुने यांसारख्या विविध अनुवांशिक सामग्रीचे भांडार असते, जे वनस्पतींच्या विविध प्रजातींमधून संकलित केले जाते; जेणेकरुन त्यांचे भविष्यात नामशेष होण्यापासून संरक्षण व्हावे आणि भावी पिढ्यांसाठी अशा महत्वाच्या वाणाचे जतन व्हावे.

भारताच्या कृषी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन  करण्यासाठी वित्त मंत्रालयाने 2025-26 च्या अर्थसंकल्पात दुसरी राष्ट्रीय जनुक पेढी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये पिकांच्या विविध प्रजाती आणि त्यांच्यासारख्या जंगली जमाती  अस्तित्वात आहेत. 811 पेक्षा जास्त लागवड केलेल्या पिकांच्या प्रजाती आणि 902 पिकांच्या जंगली जातींसह,  वनस्पती जनुक  संसाधने (पीजीआर) संरक्षित करण्यात सरकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते,जी कृषी उत्पन्नातील लवचिकता, खाद्यान्न  सुरक्षितता आणि हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे.

हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि जगभरातील अनुवांशिक विविधतेची सुरक्षितता धोक्यात आणणारी भू-राजकीय आव्हाने यासारख्या वाढत्या धोक्यांमुळे,  दुहेरी पध्दतीने संरक्षित केलेल्या जनुक पेढीची  निर्मिती करणे‌ अत्यावश्यक आहे.

हा उपक्रम कृषी जैवविविधता जतन करण्यासाठी, खाद्यान्नाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत शेती प्रणालींना समर्थन देण्याप्रती भारताच्या असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो.

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2108610) Visitor Counter : 35