ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तेल, वायू आणि ऊर्जा जागतिक प्रदर्शन 2025 मध्ये प्लॅटिनम पार्टनर म्हणून एनटीपीसीकडून अत्याधुनिक नवोन्मेषांचे प्रदर्शन


या प्रदर्शनात एनटीपीसीद्वारे शाश्वततेसाठीची बांधिलकी दृढ

Posted On: 05 MAR 2025 7:00PM by PIB Mumbai

मुंबई, 05 मार्च 2025


एनटीपीसी मुंबई येथे केमटेक द्वारे आयोजित ऑइल गॅस अँड पॉवर वर्ल्ड एक्स्पो 2025 अर्थात यंदाच्या तेल, वायू आणि ऊर्जा जागतिक प्रदर्शनात प्लॅटिनम पार्टनर म्हणून सहभागी होत आहे. 5 ते 7 मार्च 2025 पर्यंत चालणारा हा तीन दिवसांचा कार्यक्रम उद्योग धुरीण, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदारांना वीज निर्मिती, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वततेतील आधुनिक प्रगतीचा वेध घेण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल.

एनटीपीसीच्या दालनाचे उद्घाटन एनटीपीसीचे प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम-1), कमलेश सोनी आणि प्रकल्प संचालक (माही बांसवारा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प) आणि एनटीपीसी चे कार्यकारी संचालक (अणु) प्रसेनजीत पाल यांनी केले. हे दालन तीन नाविन्यपूर्ण कार्यरत मॉडेल्सद्वारे ऊर्जा संक्रमण, डीकार्बोनायझेशन आणि शाश्वततेमध्ये एनटीपीसीच्या अग्रगण्य प्रयत्नांवर प्रकाश टाकते. कचरा-ते-ऊर्जा संयंत्र घनकचऱ्याचे वीजेत रूपांतरण करण्यासाठी एनटीपीसीच्या तंत्रज्ञान प्रदर्शित करते. कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल संयंत्र त्याच्या प्रगत कार्बन ग्रहण आणि उपयोगाच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करते. याव्यतिरिक्त, एनटीपीसी अक्षय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन तंत्रज्ञानातील प्रगती प्रदर्शित करत आहे ज्याद्वारे सौर, पवन आणि हायड्रोजन-आधारित स्वच्छ ऊर्जा उपायांमध्ये त्याचे नेतृत्व अधोरेखित होते.

"एनटीपीसी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपायांद्वारे भारताच्या ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे. तेल, वायू आणि ऊर्जा जागतिक प्रदर्शन 2025 मधील आमचा सहभाग स्वच्छ ऊर्जा आणि हरित हायड्रोजनमधील आमचे प्रयत्न प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करतो, ज्यामुळे कमी कार्बन भविष्यासाठी आमचा दृष्टिकोन अधिक दृढ होतो" असे कमलेश सोनी यांनी उदघाटनावेळी नमूद केले. "भारत स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेकडे वाटचाल करत असताना, एनटीपीसी तांत्रिक प्रगतीमध्ये आघाडीवर आहे. आमच्या दालनात प्रदर्शित केलेली मॉडेल उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी आम्ही अत्याधुनिक उपाय कसे एकत्रित करत आहोत हे दाखवतात" असे प्रसेनजीत पाल यांनी सांगितले.

केमटेक द्वारे आयोजित हे  प्रदर्शन, तांत्रिक प्रगतीला आणि उद्योग सहकार्याला चालना देण्यात आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या कार्यक्रमाने 100 हून अधिक आघाडीच्या वीज क्षेत्रातील कंपन्या एकत्र आणल्या असून जगभरातील 15,000 हून अधिक ऊर्जा अग्रणी यात सहभागी होतील. या प्रतिष्ठित कार्यक्रमात एनटीपीसी चा सहभाग हरित तंत्रज्ञान अग्रेसर करण्यात, उद्योग भागीदारी मजबूत करण्यात आणि भारताच्या शाश्वत ऊर्जा संक्रमणात योगदान देण्यात त्याची बांधिलकी बळकट करतो.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2108576) Visitor Counter : 17


Read this release in: English