पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मँगनीज ओअर इंडिया लिमिटेडने फेब्रुवारी महिन्यात नोंदवले सर्वाधिक उत्पादन


एप्रिल-फेब्रुवारी मधील विक्री CPLY पेक्षा 3% वाढली

Posted On: 03 MAR 2025 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2025

आपल्या विकासाचा आलेख उंचावण्याचा विक्रम कायम ठेवत, मँगनीज ओअर इंडिया लिमिटेडने 2025 फेब्रुवारीमध्ये पुढीलप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे :

  • फेब्रुवारीत मँगनीज (Mn) खनिजाचे सर्वाधिक म्हणजे 1.53 लाख टन उत्पादन
  • फेब्रुवारीत 11,455 मीटर इतके सर्वाधिक उत्खनन करत (एक्सप्लोरेटरी कोर)CPLY पेक्षा 43% प्रभावी वाढ दर्शविली आहे.

एप्रिल-फेब्रुवारी, 2025 या कालावधीत देखील, MOIL ने पुढील उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे:

  • 14.32 लाख टनांची विक्री, CPLY पेक्षा 3% ने जास्त.
  • 94,894 मीटरचे  उत्खनन (एक्सप्लोरेटरी कोर ड्रिलिंग), जे CPLY च्या तुलनेत 20% अधिक आहे.

या उत्कृष्ट कामगिरीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याबद्दल एम ओ आय एल समूहाची प्रशंसा करत; प्रमुख व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना, (सीएमडी) यांनी येत्या वर्षभरात कंपनी अधिक भरघोस वाढीचा मार्ग दाखवेल,असा विश्वास,यावेळी व्यक्त केला.


Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2107748) Visitor Counter : 39


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil