संरक्षण मंत्रालय
डॉ. मयंक शर्मा यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक पदाचा पदभार स्वीकारला
Posted On:
01 MAR 2025 5:08PM by PIB Mumbai
डॉ. मयंक शर्मा यांनी 1 मार्च 2025 रोजी संरक्षण लेखा महानियंत्रक (सीजीडीए) पदाचा कार्यभार स्वीकारला. ते भारतीय संरक्षण लेखा सेवेचे (आयडीएएस) 1989 च्या तुकडीतील अधिकारी आहेत, आणि सरकारी अधिकारी म्हणून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा केली आहे.
डॉ. मयंक शर्मा यांनी संरक्षण लेखा विभागासह भारत सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. कॅबिनेट सचिवालयातही त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत, आणि संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी कार्यालय (यूएनओडीसी), संयुक्त राष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंध आणि फौजदारी न्याय आयोग आणि संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगात पर्यायी स्थायी प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
याव्यतिरिक्त, डॉ. मयंक शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी अकादमी आणि व्हिएन्नाच्या डिप्लोमॅटिक अकादमीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. व्हिएन्ना येथील भारतीय दूतावासातील कॉन्सुलर विभागाचे प्रमुख म्हणून सर्व कॉन्सुलर प्रकरणांची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि यूएनओडीसीमधील उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळांची हाताळणी करत होते.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107412)
Visitor Counter : 41