ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण राजस्थानमध्ये आरोग्यसेवा सुविधा मजबूत करण्यासाठी एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालय आणि एमबीआरएपीपीने मोबाईल मेडिकल युनिटला दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 28 FEB 2025 7:21PM by PIB Mumbai

मुंबई, 28 फेब्रुवारी 2025

 

माही बांसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाच्या (एमबीआरएपीपी) परिसरातील समुदायांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने 27 फेब्रुवारी 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलून फिरते वैद्यकीय पथक  (एमएमयू) ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

मुंबईच्या सीएसआर योगदानाअंतर्गत, एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1 मुख्यालय (डब्ल्यूआर-1 मुख्यालय) द्वारे निधी मिळवलेला हा उपक्रम वोक्हार्ट फाउंडेशनच्या भागीदारीत राबविला जात आहे.

एमबीआरएपीपीचे कार्यकारी संचालक (आण्विक) आणि प्रकल्प संचालक प्रसेनजीत पाल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात संदीप कुमार दास, महाव्यवस्थापक (प्रकल्प), पंकज ध्यानी, महाव्यवस्थापक (LA आणि RR), वंदना चतुर्वेदी, क्षेत्रीय मनुष्यबळ विकास  प्रमुख, NTPC WR-I मुख्यालय, सजीव चतुर्वेदी, ACE (NPCIL), तसेच प्रकल्पग्रस्त तीन पंचायतींचे सरपंच, स्थानिक ग्रामस्थ आणि MBRAPP चे कर्मचारी उपस्थित होते. वोक्हार्ट फाउंडेशनचे वरिष्ठ प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

शाश्वत आरोग्यसेवा उपक्रमांची गरज ओळखून, चतुर्वेदी यांनी सांगितले की हा उपक्रम 6 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी डब्ल्यूआर-आयच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या मेगा मेडिकल कॅम्प दरम्यान मिळालेल्या अभिप्रायातून आला आहे. एमएमयू ग्रामीण भागातील लोकांना मोफत वैद्यकीय समुपदेशन, मूलभूत निदान आणि औषधे प्रदान करेल. 

सीएसआर उपक्रम सुरू ठेवण्याची वचनबद्धता व्यक्त करताना, पाल म्हणाले की :

“एमबीआरएपीपी मध्ये आमच्या जबाबदाऱ्या वीज निर्मितीपेक्षा अधिक आहेत असा आमचा विश्वास आहे. हे मोबाईल मेडिकल युनिट आमच्या समुदायांच्या कल्याणासाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. अर्थपूर्ण सीएसआर उपक्रमांद्वारे सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न वृद्धिंगत  करत राहू..”

स्थानिक सरपंचांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि महिला आणि वृद्धांना याचा कसा लाभ होईल आणि दुर्गम भागातील लोकांसाठी चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील हे अधोरेखित केले.

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/H.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2107065) Visitor Counter : 25