संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संरक्षण मंत्रालयाच्या 'सशक्त भारत',या द्वैवार्षिक हिंदी अंकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन

Posted On: 27 FEB 2025 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीमधील साउथ ब्लॉक येथे  संरक्षण मंत्रालयाच्या 'सशक्त भारत', या द्वैवार्षिक हिंदी अंकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन केले.यात सशस्त्र दलातील जवानांचे शौर्य,देशभक्ती आणि बलिदान यावरील कविता आहेत, तसेच संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी, मग ते कोणत्याही पदावरील असोत,त्यांनी सरकारच्या धोरणांवर लिहिलेले लेख आहेत. ज्यामधून सर्वसमावेशकता आणि विविधतेमधील एकता प्रदर्शित होते.  

   

राजभाषा विभागाच्या संरक्षण मंत्रालय शाखेने हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली.हिंदी भाषा म्हणजे भारताची सामाजिक आणि सांस्कृतिक वीण घट्ट धरून ठेवणारा धागा, असे वर्णन करून या भाषेचा अवलंब आणि वापर वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांची सृजनशील प्रतिभा जोपासून, त्यांना आपले दैनंदिन कामकाज हिंदी मध्ये करायला प्रोत्साहन देणे, हे ‘सशक्त भारत’ चे उद्दिष्ट आहे. याची ई-आवृत्ती संरक्षण मंत्रालयाच्या पुढील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल (https://mod.gov.in/).

सशक्त भारत हिंदी मासिक

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार, सचिव (माजी सैनिक कल्याण) डॉ. नितेन चंद्रा, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत, यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2106697) Visitor Counter : 25


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil