सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेळेच्या वापराविषयीचे सर्वेक्षण (टीयुएस) (जानेवारी - डिसेंबर, 2024)


“रोजगार-संबंधित कार्यांमध्ये महिलांच्या सहभागात वाढ”

“पुरुष आणि महिला अशा दोन्ही घटकांच्या बाबतीत संस्कृती, विश्रांती, समाज माध्यमे आणि खेळ यामध्ये व्यतीत केला जाणारा वेळ वाढला”

Posted On: 25 FEB 2025 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2025

 

प्रस्तावना

वेळेच्या वापराविषयीचे सर्वेक्षण (टीयुएस) नागरिकांनी विविध उपक्रमांमध्ये व्यतीत केलेल्या वेळेच्या मोजमापासाठीचा आराखडा पुरवते. विविध दैनंदिन कार्यांसाठी लोक कशा प्रकारे त्यांचा वेळ उपयोगात आणतात  वेळेचे वाटप करत याचे विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रीय वेळ वापर सर्वेक्षण हाती घेणाऱ्या काही देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि चीनसह भारताचा देखील समावेश होतो. सशुल्क आणि विनामूल्य उपक्रमांमध्ये महिला आणि पुरुषांच्या सहभागाचे मोजमाप करणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. विनामूल्य सेवाभावी कार्ये, स्वयंसेवी कार्ये तसेच विनामूल्य केली जाणारी घरातील सेवा पुरवठा विषयक कार्ये यांसाठी घरातील सदस्यांचा किती वेळ व्यतीत होतो याची माहिती देणारा टीयुएस हा महत्त्वाचा स्त्रोत आहे. हे सर्वेक्षण, अध्ययन, समाजात मिसळणे, आराम करणे-विश्रांती घेणे, स्वतःची निगा राखणे इत्यादी कामांमध्ये घरातील सदस्यांच्या व्यतीत होणाऱ्या वेळाबद्दल देखील माहिती पुरवते.  

केंद्रीय सांख्यिकी तसेच कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारी ते डिसेंबर 2019 या काळात वेळेच्या वापराविषयीचे पहिले अखिल भारतीय सर्वेक्षण राबवले. जानेवारी ते डिसेंबर 2024  या कालावधीत राबवलेले सध्याचे  टीयूएस हे दुसरे अखिल भारतीय सर्वेक्षण आहे.

वेळेच्या वापराविषयीचे सर्वेक्षण, 2024 (टीयुएस, 2024) मधील निष्कर्षांचे ठळक मुद्दे:  

  • वर्ष 2024 दरम्यान, 15 ते 59 वर्षे या वयोगटातील 75 टक्के पुरुष आणि 25 टक्के महिला 24 तासांच्या संदर्भित कालावधीदरम्यान रोजगार आणि संबंधित कार्यांमध्ये सहभागी झाले होते. वर्ष 2019 मध्ये या कार्यांमध्ये15 ते 59 वर्षे या वयोगटातील 70.9 टक्के पुरुष आणि 21.8 टक्के महिला सहभागी झाल्या होत्या.
  • वर्ष 2019 मध्ये विनामूल्य घरकामासाठी 15 ते 59 वर्षे या गटातील महिला 315 मिनिटे व्यतीत करत होत्या तर 2024 दरम्यान हा कालावधी कमी होऊन 305 मिनिटे झाला. विनामूल्य कामाकडून पैसे मिळणाऱ्या कामाकडे झालेल्या स्थित्यंतराचेच हे निदर्शक आहे.
  • वय वर्षे 15 ते 59 या गटातील 41 टक्के महिला त्यांच्या घरातील सदस्यांची काळजी घेण्यात सहभागी होत्या तर याच वयोगटातील पुरुषांचा सहभाग 21.4 टक्के होता. तसेच महिलांनी या कामांसाठी प्रतिदिन 140 मिनिटे दिली तर याच वयोगटातील पुरुषांनी केवळ 74 मिनिटे दिली. ही आकडेवारी हेच स्पष्ट करते की भारतीय घरांमध्ये घरातील सदस्यांची काळजी घेण्याच्या बहुतांश जबाबदाऱ्या घरातील महिलेवरच असतात.
  • वय वर्षे 15 ते 59 या गटातील ग्रामीण जनतेपैकी 24.6 टक्के जनता स्वतःच्या वापरासाठीच्या वस्तू उत्पादनात सहभागी होते  आणि अशा कामांसाठी ते दररोज 121 मिनिटे खर्च करतात.
  • वय वर्षे 6 ते 14 या गटातील 89.3 टक्के मुलांनी 89.3 टक्के काळ शिक्षणविषयक कार्यांमध्ये घालवला आणि या मुलांनी दररोज दिवसातील 413 मिनिटे यासाठी दिली.
  • खेळण्यात घालवला. वर्ष 2019 मध्ये त्यांनी 9.9 टक्के वेळ यासाठी दिला होता.
  • वर्ष 2024 दरम्यान 6 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांनी दिवसभरातील 11 टक्के वेळ सांस्कृतिक कार्ये, विश्रांती, समाज माध्यमे आणि खेळ

सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये

  • टीयुएस, 2024 मध्ये प्रतिसाददात्यांना 30 मिनिटाच्या विहित कालावधीत ते करत असलेल्या कार्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले आणि त्याच संबंधित काळात ते रेकॉर्ड करण्यात आले.
  • आवाका: या सर्वेक्षणात 1,39,487 घरांमध्ये (ग्रामीण: 83,247 आणि शहरी: 56,240)उपक्रम राबवण्यात आला. निवडण्यात आलेल्या घरांमधील वय वर्ष 6 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक सदस्याकडून वेळेच्या वापराविषयी माहिती संकलित करण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये 6 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या एकूण 4,54,192 व्यक्तींना (ग्रामीण: 2,85,389 शहरी: 1,68,803) प्रश्न विचारण्यात आले.  
  • टीयूएस 2024 मधील महत्त्वाचे निष्कर्ष सोबत जोडलेल्या परिशिष्टात दिले असून यासंबंधीची फॅक्ट शीट https://mospi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

सर्वेक्षणातून हाती आलेले महत्वाचे निष्कर्ष

Table 1: Percentage of persons of age 6 years and above participating in different activities in a day

all-India

Description of the activity

sector

gender

rural

urban

rural+urban

male

female

person

Employment and related activities

41.1

40.5

40.9

60.8

20.7

40.9

Production of goods for own final use

21.6

6.2

16.8

13.0

20.7

16.8

Unpaid      domestic      services      for household members

54.2

53.9

54.1

27.1

81.5

54.1

Unpaid     caregiving      services     for household members

26.5

24.5

25.9

17.9

34.0

25.9

Unpaid volunteer, trainee and other unpaid work

1.0

1.1

1.0

0.9

1.1

1.0

Learning

21.7

20.7

21.4

22.6

20.2

21.4

Socializing      and      communication,

community         participation         and religious practice

90.1

90.8

90.3

89.8

90.7

90.3

Culture, leisure, mass-media and sports practices

91.8

95.8

93.0

95.3

90.7

93.0

Self-care and maintenance

100.0

100.0

100.0

100.0

100.0

100.0

Note: The estimates have been calculated considering all the activities in a time slot

 

Table 2: Average time (in minutes) spent in a day per participant of age 6 years and above in different activities

all-India

Description of the activity

sector

gender

rural

urban

rural+urban

male

female

person

Employment and related activities

417

490

440

473

341

440

Production of goods for own final use

123

64

116

137

104

116

Unpaid       domestic       services       for household members

241

232

238

88

289

238

Unpaid      caregiving      services      for household members

115

117

116

75

137

116

Unpaid volunteer, trainee and other unpaid work

121

123

122

139

108

122

Learning

413

419

414

415

413

414

Socializing and communication, community participation and religious practice

142

131

138

138

139

138

Culture, leisure, mass-media and sports practices

165

183

171

177

164

171

Self-care and maintenance

711

701

708

710

706

708

Note: The estimates have been calculated considering all the activities in a time slot

Table 3: Percentage share of total time in different activities in a day per person of age 6 years and above

 

all-India

 

Description of the activity

sector

gender

 

rural

urban

rural+urban

male

female

person

 

Employment         and         related activities

11.9

13.8

12.5

19.9

4.9

12.5

 

Production of goods for own final use

1.9

0.3

1.4

1.3

1.5

1.4

 

Unpaid domestic services for household members

9.1

8.7

9.0

1.7

16.4

9.0

 

Unpaid caregiving services for household members

2.1

2.0

2.1

0.9

3.3

2.1

 

Unpaid volunteer, trainee and other unpaid work

0.1

0.1

0.1

0.1

0.1

0.1

 

Learning

6.3

6.0

6.2

6.5

5.8

6.2

 

Socializing and communication, community      participation      and

religious practice

8.9

8.3

8.7

8.6

8.8

8.7

 

Culture, leisure, mass-media and sports practices

10.5

12.2

11.0

11.7

10.3

11.0

 

Self-care and maintenance

49.4

48.7

49.2

49.3

49.0

49.2

 

Total

100.0

100.0

100.0

100.0

100.0

100.0

 

Note: (i) The estimates have been calculated considering all the activities in a time slot

(ii) Figures may not add up to 100 due to rounding off.

 

 

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106204) Visitor Counter : 14


Read this release in: English , Urdu , Hindi