वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथील ऑरिक येथे उद्योग भागधारक आणि संघटनांशी साधला संवाद


महाराष्ट्र विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याने ते व्यवसाय आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी अनुकूल ठिकाण बनले आहे : गोयल

केंद्रीय मंत्र्यांनी नियोजित दिघी बंदर औद्योगिक क्षेत्राचे केले हवाई सर्वेक्षण

Posted On: 20 FEB 2025 10:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी जयंतीदिनी  राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम (एनआयसीडीपी) अंतर्गत विकसित केलेल्या औरंगाबाद औद्योगिक शहर (ऑरिक), शेंद्रा भेट दिली. त्यांनी ऑरिक शेंद्रा येथे कार्यरत असलेल्या विविध उद्योगांनाही भेट दिली.यामध्‍ये कोटाल फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड, आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स आणि उमासन्स ऑटो कॉम्पो प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगांचा समावेश होता. विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याच्या दृष्टीने या युनिट्सतर्फे होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

ऑरिकमध्ये एका समर्पित कौशल्य विकास केंद्राची आत्यंतिक गरज असल्याचे लक्षात घेऊन मंत्र्यांनी उद्योग भागधारकांच्या सहकार्याने कौशल्य आणि रोजगार केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली.

विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन दिल्याबद्दल गोयल यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले, यामुळे तो व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी एक अनुकूल ठिकाण बनला आहे. महाराष्ट्राकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याच्या सक्रिय सरकारी धोरणांचा, धोरणात्मक स्थानाचा, कुशल कामगारांचा आणि मजबूत औद्योगिक पायाचा फायदा होऊ शकतो.

यासोबतच, मंत्री पीयूष गोयल यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी ऑगस्ट 2024 मध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या एनआयसीडीपी अंतर्गत येणाऱ्या दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र (डीपीआयए) आणि जवळच्या महत्त्वाच्या मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीचे हवाई सर्वेक्षण देखील केले. अधिकाऱ्यांनी डीपीआयए येथे प्रगत ट्रंक पायाभूत सुविधा, एकात्मिक मास्टर प्लॅनिंग, मागणी मूल्यांकन, लक्ष्य क्षेत्रे आणि अंमलबजावणीच्या वेळापत्रकाबद्दल मंत्र्यांना माहिती दिली. मुंबई-गोवा महामार्गावरील धोरणात्मक स्थान आणि दिघी बंदराच्या जवळ असल्याने या प्रकल्पात प्रचंड क्षमता आहे हे देखील यावेळी अधोरेखित करण्यात आले. इतरांसाठी एक आदर्श उदाहरण निर्माण करण्याच्या दृष्टीने डीपीआयएसाठी सर्वोत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.

या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ (एनआयसीडीसी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेड (एमआयटीएल) चे अधिकारी उपस्थित होते, ज्यांना व्यवसाय सुलभतेसाठी आवश्यक ते निर्देश माननीय मंत्र्यांनी दिले.


S.Bedekar/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2105172) Visitor Counter : 42


Read this release in: English , Urdu , Hindi