पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
कचऱ्याचा पुनर्वापर आणि हवामान बदल 2025’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री,भूपेंद्र यादव यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
18 FEB 2025 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज ‘कचऱ्याचा पुनर्वापर आणि हवामान बदल 2025’ या विषयावर भारतीय पुनर्वापर आणि पर्यावरण उद्योग संघटना,रिआई (REIAI) यांच्याद्वारे आयोजित केलेल्या एक दिवसीय परिषदेचे आज उद्घाटन
केले.

उद्घाटन सत्राला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, "प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक आणि घातक कचऱ्याचे प्रमाण भारतात वेगाने वाढत असून, त्यामुळे भारतात दरवर्षी सुमारे 62 दशलक्ष टन कचरा निर्माण होतो. घ्या, बनवा आणि विल्हेवाट लावा, यासाठी असलेले पूर्वीचे आर्थिक मॉडेल यापुढे उपयोगाचे नाही.जमिनीवरील कचऱ्याचा वाढता भार,नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि अनियंत्रित कचऱ्याची विल्हेवाट न झाल्याने होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. वर्तुळाकार अर्थव्यवस्था हा केवळ पर्याय नाही; तर ती आवश्यकता आहे. हे साहित्य आपण कसे तयार करतो, वापरतो आणि व्यवस्थापित करतो यात त्यामुळे मूलभूत बदल घडून येतो." चांगले कार्य करणारी वर्तुळाकार अर्थव्यवस्था केवळ नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करत नाही तर औद्योगिक नवकल्पना, आर्थिक स्पर्धात्मकता आणि रोजगार निर्मितीलाही चालना देते, असे ते म्हणाले.
देशातील पुनर्वापर उद्योगाला नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांची आयात कमी करण्यासाठी आणि नवीन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन यादव यांनी यावेळी केले."वर्तुळाकार अर्थव्यवस्थेतील तत्त्वांचा अवलंब केल्याने प्रचंड आर्थिक फायदा होऊ शकतो.संसाधन कार्यक्षमतेत होणारा हा बदल आत्मनिर्भर भारताच्या आमच्या राष्ट्रीय तत्वांशी हे सुसंगत आहे, ज्यामुळे भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता जागतिक बाजारपेठांमध्ये वाढते",असे यादव पुढे म्हणाले.


सरकारने धोरणे निश्चित केली आहेत परंतु विकासाची शाश्वती आणि संसाधनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उद्योग-व्यापी वर्तुळाकार पद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे, मंत्रीमहोदयांनी या दिशेने प्रयत्न करण्यासाठी आखलेल्या 4 प्रमुख धोरणांवर प्रकाश टाकला:
वर्तुळाकार अर्थव्यवस्थेशी सुसंगत उत्पादने पुन्हा डिझाइन करणे: कंपन्यांनी एकदाच-वापरण्याच्या मॉडेल्सच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे आणि पुनर्वापरासाठी उत्पादने डिझाइन करणे आवश्यक आहे.जैविक पध्दतीने निचरा होईल अशी, पुन्हा वापरता येण्याजोगी आणि मॉड्यूलर घटकांचे एकत्रीकरण करून उत्पादन केल्याने वस्तूंचे जीवन चक्र वाढण्यात आणि कचरा कमी करण्यास मदत होईल.
प्रगत पुनर्वापर तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक: कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब परिवर्तन आणू शकतो, ज्यामुळे पुनर्प्राप्ती दर सुधारू शकतो.
पुरवठा साखळी सहयोग बळकट करणे: व्यवसायांना संसाधनांचा वापर कमी करण्यासाठी, साखळी पध्दतीने (क्लोज-लूप) उत्पादन प्रणाली तयार करण्यासाठी आणि दुय्यम कच्च्या मालासाठी बाजारपेठ तयार करण्यासाठी मूल्यशृंखलेमध्ये सहयोग करणे आवश्यक आहे.
ग्राहक जागरूकता आणि वर्तणूक बदल: पुनर्वापर पध्दतींसाठी ग्राहकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे.उद्योगांनी ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी, पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपभोगाच्या टिकाऊ वस्तूंचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोहिमा आयोजित करण्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104526)
Visitor Counter : 32