भारताचा लोकपाल
azadi ka amrit mahotsav

लोकपालांनी दिलेल्या निर्देशानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या Reserve Bank – Integrated Ombudsman Scheme, 2021 या योजनेच्या हिंदी भाषेतील रिज़र्व बैंक-एकीकृत लोकपाल योजना 2021 या अनुवादात बदल झाल्यानंतर आता ही योजना रिज़र्वबैंक-एकीकृत ओम्बड्समैन योजना, 2021 म्हणून ओळखली जाणार

Posted On: 17 FEB 2025 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025

सार्वजनिक क्षेत्रातील काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणे तसेच अशा प्रकरणाशी संबंधित किंवा अशाच प्रकारच्या प्रकरणांशी संबंधित मुद्यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आस्थापनांकरता लोकपाल आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीतील आस्थापनांकरता लोकायुक्त व्यवस्था  करण्याची तरतूद  लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 मध्ये केली गेली आहे. हा कायदा संसदेत संमत झाल्यानंतर लागू झाला होता. 2013 सालापासून अंमलात आलेल्या या काद्याच्या कलम 3 मध्ये, या कायद्या अंतर्गत स्थापित केलेल्या संस्थेसाठी 'लोकपाल' हा शब्द वापरला जाईल आणि हा नियम 16.01.2024 पासून लागू असेल असे म्हटले आहे.

दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकने 2021 मध्ये Reserve Bank-Integrated Ombudsman Scheme, 2021 सुरू केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये  कमतरता आढळून येत असल्या संबंधीच्या ग्राहकांच्या तक्रारींचे विनामूल्य निवारण करता यावे हा या योजनेचा उद्देश होता. मात्र या योजनेचा हिंदी भाषेत अनुवाद करताना, तो  रिज़र्व बैंक - एकीकृत लोकपाल योजना, 2021 असा केला गेला. मात्र 2013 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 अमलात आल्यानंतर, या कायद्याच्या  कलम 3 मध्ये नमूद केल्यानुसार, या कायद्याअंतर्गत स्थापित केलेल्या संस्थांसाठीच 'लोकपाल' हा शब्द वापरला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या योजनेचा अनुवाद करताना, त्यात वापरला गेलेला लोकपाल (Lokpal) हा शब्द म्हणजे एका अर्थाने  लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 मधील तरतुदींशी विसंगती साधणारी  कृती आहे.

ही विसंगती  आढळल्यामुळे ही बाब भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली गेली आणि त्यांनी योग्य कार्यवाही करून, आपल्या योजनेच्या शीर्षकाच्या अनुवादात तसेच Ombudsman Scheme शी संबंधित सर्व दस्तऐवजांमध्ये  Reserve Bank-Integrated Ombudsman Scheme, 2021 (‘रिज़र्वबैंक-एकीकृत ओम्बड्समैन योजना, 2021) असे बदल त्वरित करावेत असे निर्देश दिले गेले होते.

त्यानुसार आता भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या Reserve Bank-Integrated Ombudsman Scheme (RB-IOS), 2021’. The RB-IOS 2021 या योजनेच्या शीर्षकाच्या हिंदी अनुवादातील लोकपाल हा शब्द बदलला असून त्याऐवजी ओम्बड्समैन या शब्दाचा वापर केला आहे, आणि या बदलानंतर या योजनेचा हिंदी भाषेतील अनुवाद ‘रिज़र्वबैंक-एकीकृत ओम्बड्समैन योजना, 2021 असा झाला असल्याचे सर्व संबंधितांना सूचित केले जात आहे.


S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2104236) Visitor Counter : 22


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil