वस्त्रोद्योग मंत्रालय
सिल्कटेक 2025 या नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केंद्रीय रेशीम मंडळाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांच्या हस्ते उद्घाटन
परिषदेदरम्यान केंद्रीय रेशीम मंडळाच्या संशोधन आणि विकास संस्था आणि अन्य संशोधन व विकास संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांच्यात 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
Posted On:
17 FEB 2025 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025

भारत टेक्स 2025 या भव्य वस्त्रोद्योग कार्यक्रमाचा भाग म्हणून आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सिल्कटेक 2025 या सीएसबीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी केले. वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत रांची येथील सीएसबी-केंद्रीय टसर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि सीएसबी-केंद्रीय सिल्क तांत्रिक संशोधन संस्था (सीएसटीआरआय) यांनी "रेशीम क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान - सिल्कटेक 2025" या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.

भाषणादरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी रेशीम मूल्य साखळीतील शून्य कचरा तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला आणि दर्जेदार संशोधन आणि सहकार्याद्वारे कापडाचे उत्पादन आणि निर्यात तिप्पट करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचा उल्लेख केला.

वस्त्रोद्योग मंत्रालय सचिव नीलम शमी राव यांनी 'रेशीम समग्र' च्या कार्यान्वयानंतर रेशीम शेतीतील महत्त्वपूर्ण बदलाकडे लक्ष वेधले.रेशीम उप-उत्पादनांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुख्य प्रवाहात स्थान मिळवले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
परिषदेदरम्यान वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी सिल्कटेक 2025 आणि 'प्रौद्योगिकी विवरणक'(तंत्रज्ञान वर्णनकर्ता) या रेशीम क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील दोन स्मरणिका आणि सारांश पुस्तकांचे प्रकाशन केले.परिषदेदरम्यान,केंद्रीय रेशीम मंडळाच्या संशोधन आणि विकास संस्था आणि अन्य संशोधन व विकास संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांच्यात 06 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

या परिषदेत वस्रोद्योगाव्यतिरिक्त सौंदर्यप्रसाधने,औषध निर्मिती आणि अन्य क्षेत्रातील रेशमाच्या नवीन अनुप्रयोगांवर विचारमंथन आणि त्याच्या प्रचारावर तसेच जागतिक बाजारपेठेतील कल आणि भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी रेशीम उत्पादन साखळीत शाश्वत नवकल्पनांवर भर देणाऱ्या रेशीमची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104159)
Visitor Counter : 29