संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एअरो इंडिया 2025 च्या तिसऱ्या दिवशी झिंबाब्वे, येमेन, इथिओपिया,गॅम्बिया आणि गॅबान यांच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत घेतल्या द्विपक्षीय बैठका
प्रविष्टि तिथि:
12 FEB 2025 8:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025
एअरो इंडिया 2025 च्या दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज म्हणजे 12 फेब्रुवारी 2025 रोजी बंगळुरू इथं झिंबाब्वे, येमेन, इथिओपिया, गॅम्बिया आणि गॅबानच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत द्विपक्षीय बैठका घेतल्या.
झिम्बाब्वेच्या संरक्षण मंत्र्यांशी झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूने सध्याच्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि झिम्बाब्वेच्या सशस्त्र दलांचे प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी या बाबींचा आढावा घेतला. संरक्षण सहकार्याच्या सामंजस्य करारावर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि यामुळे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला.
इथिओपियन संरक्षण मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी वाढत्या द्विपक्षीय संरक्षण संबंधांबद्दल संतोष व्यक्त केला. घनिष्ट आणि सक्रिय संबंधाचे महत्त्व ओळखून दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी सध्याचे द्विपक्षीय बंध संस्थात्मक पातळीवर दृढ करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगातील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली.
येमेनच्या संरक्षण मंत्र्यांबरोबरच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रात सहयोग वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आणि या दिशेने पुढचे पाऊल म्हणून दोन्ही नेत्यांनी येमेनला लष्करी प्रशिक्षण,सेनादलांची क्षमता वृद्धी यावर चर्चा केली. या बैठकीने भारत आणि येमेन यांच्यामधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होण्यासाठी अधिक चालना आणि मार्गदर्शन दिले.
गॅम्बियाच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.दोन्ही नेत्यांनी क्षमता वृद्धीसाठी परस्पर-सहकार्य वाढवण्यावर शिक्कामोर्तब केलं.दोन्ही बाजूच्या क्षमता वृद्धी आणि परस्पर लाभासाठी दोन्ही बाजूकडील सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक करण्याबद्दल चर्चा झाली.संरक्षण क्षेत्रातील सहकार्यामध्ये असलेल्या प्रचंड संधी दोन्ही बाजूंनी अधोरेखित केल्या.
गॅबानच्या संरक्षण मंत्र्यांबरोबरच्या बैठकीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी दोन्ही बाजूंना मिळाली.दोन्ही बाजूंनी संरक्षण उद्योगाच्या क्षेत्रात सहकार्याची शक्यता आजमावल्या.
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2102491)
आगंतुक पटल : 73