संरक्षण मंत्रालय
दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ संपन्न
Posted On:
09 FEB 2025 8:13PM by PIB Mumbai
दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, लष्करी परिचारक सेवेतील अधिकारी, निवृत्त अधिकारी, सिव्हिल नर्सिंग विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लेफ्टनंट जनरल शंकर नारायण, कमांडंट, एएच (आर अँड आर) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा राखण्यासाठी प्रेरितही केले. कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी लष्करी परिचारक सेवेच्या अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल शीना पी डी यांनी विद्यार्थ्यांना परिचारक सेवेची शपथ दिली.
दीपप्रज्वलन हे तज्ञांकडून विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि बुद्धी प्रदान करण्याचे प्रतीक आहे. मेजर जनरल शीना पी डी यांनी प्राचार्य आणि प्राध्यापकांना दीप प्रदान केले आणि नंतर हे दीप परिचारक कॅडेट्सना प्रदान करण्यात आले.
परिचारक सेवा ही रुग्णसेवा करण्याची, काळजी घेण्याची आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे महान कार्य आहे, हा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली.
Z405.jpg)
8C04.jpg)
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101199)
Visitor Counter : 42