संरक्षण मंत्रालय
अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री यांचे प्रतिनिधी जनरल सय्यद चनेग्रीहा भारताच्या भेटीवर येणार
Posted On:
05 FEB 2025 12:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025
अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि त्यांच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री याचे एक प्रतिनिधी म्हणून 06 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारताला भेट देणार आहे. ते बेंगळुरू इथे होणाऱ्या एअरो इंडिया 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवादही साधणार आहेत. ते ब्रिज (BRIDGE – Building Resilience through International Defence and Global Engagement’) - अर्थात आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि जागतिक सहभागाच्या माध्यमातून कोणत्याही परिसस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करणे लवचिकता निर्माण करणे या विषयावरील संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेतही सहभागी होणार आहेत. त्यांच्या या भेटीमुळे धोरणात्मक भागीदारीसाठीचा सुलभ संवाद सुरू होऊ शकणार आहे. एअरो इंडियाच्या निमित्ताने ते भारतातील आपल्या समकक्ष अधिकऱ्यांसोबतही महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.
आपल्या या भारत भेटीत जनरल सय्यद चनेग्रीहा नवी दिल्ली इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील, यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही दिला जाईल. जनरल सय्यद चनेग्रीहा भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांचीही भेट घेणार आहेत.
आपल्या भारत भेटीच्या दरम्यान जनरल सय्यद चनेग्रीहा संरक्षण अंतराळ यंत्रणेच्या (Defence Space Agency) छायाचित्र प्रक्रिया आणि विश्लेषण केंद्र, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, तसेच आयएनएस हंसा या प्रमुख नौदल विमान वाहतूक प्रशिक्षण आस्थापनेसह अनेक लष्करी संस्थांना भेट देणार आहेत. यासोबतच ब्राह्मोस एअरोस्पेस, गोवा शिपयार्ड लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एल अँड टी डिफेन्स आणि भारत फोर्ज यांसह संरक्षण आणि हवाई अंतराळ क्षेत्रातील एअरोस्पेस सार्वजनिक आणि खाजगी आस्थापनांनाही ते भेट देणार आहेत.
जनरल चनेग्रीहा यांच्या या भेटीमुळे भारत आणि अल्जेरियाच्या लष्करामधील परस्पर सहकार्य सुरू राहण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. यामुळे या दोन्ही मित्र राष्ट्रांमधील पूर्वापार चालत आलेले संबंधि अधिक दृढ होतील, तसेच यामुुळे परस्पर हिताच्या अनेक मुद्यांमधील सहकार्याचाही विस्तार होईल.
* * *
JPS/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2099948)
Visitor Counter : 20