संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात भविष्याच्या दृष्टीने सज्ज लष्करी नेतृत्व या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

Posted On: 02 FEB 2025 12:54PM by PIB Mumbai

 

सिकंदराबाद येथील संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात 30 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत Developing Military Strategic Authentic Leaders (MISAL): Re-Imagining Concepts and Strategies अर्थात परिपूर्ण लष्करी नेतृत्वाची जडणघडण : संकल्पना आणि रणनितींची पुनर्कल्पना या विषयावर वार्षिक राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले. या चर्चासत्रात आधुनिक युद्धाच्या स्वरुपाला अनुसरून उदयोन्मुख  नेतृत्वाच्या आरखड्याच्या शक्यता तपासून घेण्याच्या उद्देशाने अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी, रणनिती तज्ञ आणि आघाडीचे  शिक्षणतज्ञ  एकत्र आले होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी या चर्चासत्रात आपले प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. सध्याच्या विध्वंस घडवू शकणार्‍या तंत्रज्ञानानाच्या आणि गुंतागुंतीच्या भूराजकीय बदलांच्या युगात, या परिस्थितीनुरूप कृती करू शकेल अशा नेतृत्वाची तातडीची गरज त्यांनी आपल्या प्रास्ताविकात अधोरेखित केली.

या चर्चासत्राच्या निमित्ताने  झालेल्या लष्करी धोरणे आणि परिपूर्ण लष्करी नेतृत्वाच्या जडणघडणीसाठीची रणनिती या विषयावरील सत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या  सत्रात व्हाइस अॅडमिरल विश्वजित दासगुप्ता (निवृत्त) आणि लेफ्टनंट जनरल अजय चांदपुरिया यांनी विध्वंस घडवू शकणार्‍या तंत्रज्ञानाचा प्रभाव, बदलते भूराजकीय पैलू आणि धोरणात्मक लष्करी नेतृत्वासंबंधी विकसित होत असलेली भूमिका यावर चर्चा केली. या परिसंवादात सहभागी झालेल्या शिक्षणतज्ज्ञांनी नेतृत्व उत्क्रांती, प्राचीन भारतीय ज्ञानप्रणालीतून मिळणारी शिकवण तसेच एकात्मिक, आंतरसेवा नेतृत्व यासाठी आवश्यक कौशल्यांशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली. ज्येष्ठ माजी सैनिकांनी आधुनिक काळातली लष्करी आव्हाने आणि भविष्यासाठी सज्ज अशा सशस्त्र दलांना आकार देण्यासाठी गरज असलेल्या नेतृत्वाच्या प्रारुपाविषयी कारणमिमांसायुक्त मते मांडली.

सैन्यदलाची तंत्रज्ञान विषयक प्रगती आणि संरचनात्मक सुधारणांचा योग्य लाभ घेणारी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या लष्करी नेतृत्वाची तातडीची गरज  या चर्चासत्राने अधोरेखित केली. लष्करी नेतृत्वाला आकार देणारे धोरण, संकल्पना आणि रणनीती यावर तातडीने काम व्हावे, याबाबतीतील सैद्धांतिक आराखड्याच्या शक्यताही अभ्यासल्या जाव्यात तसेच याबाबतीतले लष्करी संदर्भात वास्तविक जगातील अनुभवही पडताळून पाहावेत यासाठीचा एक सामायिक मंच या चच्रासत्राने उपलब्ध करून दिला.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2098899) Visitor Counter : 47


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil