नौवहन मंत्रालय
भारताच्या सागरी सामर्थ्यासाठी महिलांचे अद्वितीय योगदान महत्त्वाचे : शंतनू ठाकूर
'सागर में योग' – कंपलीट वेलनेस प्रोग्राम' आणि 'सागर में सन्मान' या प्रमुख कार्यक्रमांचा शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2025 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2025
महिला खलाशी यांचे कार्य जागतिक स्तरावर चिकाटी आणि उत्कृष्टतेचे प्रतीक असून भारताच्या सागरी सामर्थ्यात महिलांचे अद्वितीय योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केले.

मुंबईतील द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) येथे अनुक्रमे “सागर में योग – कंपलीट वेलनेस प्रोग्राम'” आणि “सागर में सम्मान” या दोन उपक्रमांचे बोधचिन्ह आणि मध्यवर्ति संकल्पनेचे अधिकृतपणे अनावरण ते बोलत होते.
शंतनू ठाकूर म्हणाले की, घरापासून दूर काम करताना अनेकदा वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणाऱ्या महिला खलाशी यांना यथायोग्य सन्मान आणि पाठिंबा मिळावा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
पंतप्रधानांच्या सागरी भारत व्हिजन 2030 पासून प्रेरित, “सागर में सम्मान” हा सागरी उद्योगात महिलांची भूमिका ओळखून त्यांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. हा कार्यक्रम आदर आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो आणि महिला खलाशांना सन्मानाने आणि अभिमानाने काम करण्याची प्रेरणा देतो. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना प्रगतिशील मार्गक्रमण करता येईल, याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न आहे.

सागर में योग प्रत्येक टप्प्यावर निरोगीपणावर लक्ष केंद्रित करते, समुद्रपूर्व, समुद्रात आणि समुद्रानंतरच्या टप्प्यांवर सागरी प्रशिक्षण आणि कार्यान्वयानात योग आणि कल्याण अश्या पद्धतींचा समावेश करून, महिला खलाशी या कायम निरोगी व तंदुरुस्त राहून प्रत्येक प्रवासासाठी तयार राहतील याची खात्री देत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० हे महिला खलाशांना उत्थान देऊन आणि भारताला सागरी उत्कृष्टतेकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आशादायी असल्याचे शिपिंग महासंचालक श्याम जगनाथन यांनी सांगितले. सागरी समुदायातील महिलांना दिला जाणारा आदर आणि मान्यता वाढवणे याच दृष्टीकोणातून "सागर में सम्मान" या उपक्रमाचा जन्म झाला आहे.
आरोग्य विषयक परिणामांचा मागोवा घेऊन, सागर में योग नाविकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक सुधारणा आणि विस्तार करेल. या उपक्रमामुळे वैद्यकीय आणीबाणी-सदृश्य परिस्थिति कमी होतील, आरोग्यसेवा खर्च कमी होईल आणि उलाढालीचे दर कमी होतील, ज्यामुळे एक सहाय्यक सागरी वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. सागर में योग हे आमच्या नाविकांच्या प्रवासापूर्वी, दरम्यान आणि नंतर त्यांच्या समग्र कल्याणासाठी आमच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या प्रारंभीक कार्यक्रमात भागधारक आणि खलाशांनी उपस्थिती लावून खलाशांच्या आरोग्यासाठी जागतिक परिमाण स्थापित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यात आली आहे. विशाल हिंद महासागरापासून ते प्रगतीशील किनारपट्टी पर्यंत, भारताचा सागरी वारसा विकासाला चालना देत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
* * *
H.Raut/H.Kenekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2098006)
आगंतुक पटल : 54