ग्रामीण विकास मंत्रालय
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत (पीएम-जनमन) महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांना गती देण्याची ग्रामविकास मंत्रालयाची घोषणा
ग्राम विकास मंत्रालयाने अंदाजे 50.35 कोटी रुपये गुंतवणुकीसह 50.13 किमी लांबीच्या 27 रस्ते विकास प्रकल्पांना दिली मंजुरी
पीएम-जनमन प्रकल्प महाराष्ट्रात विकास आणि समृद्धीला चालना देणार
Posted On:
30 JAN 2025 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
महाराष्ट्रात ग्रामीण भागातील दळणवळण मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल म्हणून, ग्राम विकास मंत्रालयाने पीएम-जनमन (PM-JANMAN) योजनेच्या दळणवळण घटकांतर्गत महाराष्ट्रात अंदाजे 50.35 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 50.13 किमी लांबीच्या 27 रस्त्यांना मंजुरी दिली आहे.
हा ऐतिहासिक उपक्रम:
- राज्यातील 27 पीव्हीटीजी (विशेष दुर्बल आदिवासी गट) वस्त्यांना दळणवळणासाठी सर्व प्रकारच्या हवामानाला अनुकूल रस्ते प्रदान करेल.
- राज्यातील विशेष दुर्बल आदिवासी गटांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल.
- ग्रामीण भागातील दळणवळण सुधारेल, दुर्गम गावे आणि शहरी केंद्रांमधील अंतर दूर होईल.
- या प्रदेशात आर्थिक विकास, व्यापार आणि वाणिज्य व्यवहारांना चालना मिळेल.
- आरोग्य सेवा, शिक्षण आणि बाजारपेठेसारख्या अत्यावश्यक सेवा सहज उपलब्ध होतील.
- रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
पीएम-जनमन अंतर्गत प्रकल्पांचा या क्षेत्रावर परिवर्तनकारी प्रभाव पडेल, महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांचा विकास आणि समृद्धीला बळ मिळेल आणि समावेशक विकासाप्रति असलेली सरकारची वचनबद्धता दृढ होईल.
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2097644)
Visitor Counter : 28