विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-आयआयटीआरच्या हीरक महोत्सवाला डॉ.जितेंद्र सिंह यांची उपस्थिती : विषमुक्त भारतासाठी वचनबद्धतेचा संकल्प
Posted On:
28 JAN 2025 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025
सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयआयटीआर म्हणजेच भारतीय विषविज्ञान संशोधन संस्थेच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते.संस्थेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला मंत्री जितेंद्र सिंह यांनी संबोधित केले.
या कार्यक्रमात संस्थेचे योगदान आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमात त्यांनी संस्थेच्या महत्त्वाच्या कामगिरीचे कौतुक केले. या कार्यामुळे संस्थेविषयी देशभरात विश्वासार्हता निर्माण झाली.विषविज्ञान क्षेत्रात संशोधन आणि कार्य करणारी भारतातील एकमेव आणि कदाचित जगातील काही मोजक्या संस्थांपैकी ही एक अशी संस्था आहे.
सार्वजनिक आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यात संस्थेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे मंत्र्यांनी कौतुक केले आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत,2047 पर्यंत "विषमुक्त भारत" सुनिश्चित करण्यासाठी संस्थेच्या कार्याचा अधिक विस्तार करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात पर्यावरणाच्या आणि आरोग्यविषयक आव्हानांवर संशोधन सहकार्याला चालना देण्यासाठी,‘डायमंड ज्युबिली इंटर्नशिप’आणि ई-परम उपक्रम सुरू करण्यात आले. तसेच कौशल्य विकास आणि डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘WARMEST’ आणि ‘EARTH-25’ परिषदांचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या सहा दशकांमध्ये संस्थेने घडवून आणलेल्या परिवर्तनकारी कार्यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रकाश टाकला. संस्थेमध्ये औद्योगिक विषशास्त्राकडे मूळ लक्ष केंद्रित करण्यापासून ते पर्यावरणीय धोके, अन्न सुरक्षा आणि आरोग्यविषयक येणारी संकटे, यासारख्या समकालीन समस्यांना तोंड दिले आहे, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी ओडिशा चक्रीवादळ आणि साथीच्या जलोदराच्या आजाराच्या उद्रेकासारख्या राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच नमामी गंगे आणि हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण यासारख्या प्रमुख सरकारी मोहिमांमध्ये कामाच्या एकत्रीकरणावर भर दिला.
डॉ.जितेंद्र सिंह यांनी हिमोग्लोबिन सामग्री आणि सिकलसेल ॲनिमियासाठी ‘ऑन-फिल्ड डिटेक्शन किट’चे अनावरण केले. तसेच हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी किफायतशीर साधनांचा विकास करण्यात संस्थेच्या नवकल्पनांचे कौतुक केले. यामुळे आरोग्यसेवेची सुलभता सुधारण्याची मोठी क्षमता निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2097190)
Visitor Counter : 24