संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन 2025 : नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेतील विजेत्यांना संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते  बक्षिसे प्रदान

प्रविष्टि तिथि: 25 JAN 2025 3:56PM by PIB Mumbai

 

76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा (आरडीसी) भाग म्हणून, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली. संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या ज्युरीनी  24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महा अंतिम फेरीच्या शेवटी विजेत्यांची निवड केली.या ज्युरीमध्ये सशस्त्र दलाच्या प्रत्येक शाखेतील सदस्यांचा समावेश होता.

पाईप बँड (मुली) या गटातील  पहिले पारितोषिक  पीएम श्री कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, पटमडा, पूर्व सिंगभूम, झारखंड (पूर्व विभाग) यांनी तर दुसरे पारितोषिक - भोंसला मिलिटरी स्कूल (गर्ल्स), नाशिक, महाराष्ट्र (पश्चिम विभाग) यांनी मिळवले.

पाईप बँड (मुले)   पहिले पारितोषिक - सिटी मोंटेसरी स्कूल, कानपूर रोड लखनऊ, उत्तर प्रदेश (उत्तर विभाग) ने पटकावले  तर पश्चिम विभागात महाराष्ट्राच्या राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी इस्लामपूर, सांगलीने तिसरे पारितोषिक प्राप्त केले.

ब्रास बँड (मुली) या गटात  पहिले पारितोषिक  गव्हर्मेंट सिनिअर सेकंडरी स्कूल वेस्ट पॉइंट, गंगटोक, सिक्कीम (पूर्व विभाग) यांनी मिळवले.तर  ब्रास बँड (मुले) गटात  पहिले पारितोषिक - प्रिन्स लोटस व्हॅली अकादमी, सिकर, राजस्थान (पश्चिम विभाग)

प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन संघांना रोख पारितोषिक (पहिले - 21,000 रुपये, दुसरे - 16,000 रुपये आणि तिसरे - 11,000 रुपये), चषक आणि प्रमाणपत्र देण्यात  आले. प्रत्येक श्रेणीतील उर्वरित संघाला प्रत्येकी 3,000 रुपये रोख प्रोत्साहनपर  पारितोषिक देण्यात आले.

पाइप बँड गर्ल्सचे विजेते  पीएम श्री कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, पटामडा, पूर्व सिंगभूम, झारखंड (पूर्व विभाग) आणि लष्करी बँड संघ - 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात एक प्रमुख आकर्षण असतील कारण ते संचलनात आपला कलाविष्कार सादर करणार आहेत.

29 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या बीटिंग रिट्रीट समारंभात विजय चौकात पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, बेळगाव कॅन्ट. कर्नाटक (दक्षिण विभाग) आणि गव्हर्मेंट सिनिअर सेकंडरी स्कूल, वेस्ट पॉइंट, गंगटोक, सिक्कीम (पूर्व विभाग) हे दोन बँड आपला कलाविष्कार सादर करतील.

संरक्षण राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विजेत्यांचे तसेच स्पर्धेतील सहभागींचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या विकसित भारतचे ब्रँड अँबेसेडर म्हणून वर्णन केले. तरुणांनी राष्ट्राला प्रथम स्थान द्यावे आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्र्यांनी केले.

प्रजासत्ताक दिन समारंभ 2023 पासून, संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय संयुक्तरित्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा आयोजित करत आहे. शालेय बँड शाळकरी मुलांमध्ये त्यांची शाळा आणि देशाबद्दल एकता, आपलेपणा आणि अभिमानाची भावना जागृत करतो.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2096188) आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil