वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारी ई-मार्केटप्लेसने प्रस्थापित केला नवा उच्चांक; आर्थिक वर्ष 24-25 च्या 10 महिन्यांत सकल व्यापारी मूल्याने ओलांडला 4 लाख कोटी रुपयांचा टप्पा


एकूण जीएमव्हीच्या 62% सेवा विभागाचा वाटा; केंद्र सरकारी संस्था प्रमुख खरेदीदार म्हणून उदयास

जीईएम ने एका दिवसात 49,960ऑर्डरवर प्रक्रिया करण्याचा टप्पा गाठला

Posted On: 24 JAN 2025 6:29PM by PIB Mumbai

 

चालू आर्थिक वर्ष 2024-25 (आर्थिक वर्ष) च्या 10 महिन्यांतच सरकारी ई मार्केटप्लेस (जीईएम) ने गेल्या वर्षीच्या 4 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकी सकल व्यापारी मूल्याला (जीएमव्ही) ला मागे टाकले आहे. 23 जानेवारी 2025 पर्यंत, जीईएम ने 4.09 लाख कोटी रुपयांचे जीएमव्ही गाठले आहे, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळजवळ 50% वाढ दर्शविते.

विभागवार सकल व्यापारी मूल्याच्या बाबतीत, सेवा विभागाचा वाटा  2.54 लाख कोटी रुपये (एकूण जीएमव्ही च्या 62%) होता, तर उत्पादन विभागाचा वाटा 1.55 लाख कोटी रुपये (एकूण जीएमव्ही च्या 38%) होता.

या आर्थिक वर्षात सरकारी ई-मार्केटप्लेस आणि सकल व्यापारी मूल्यात लक्षणीय वाढ होण्यास केंद्र सरकारच्या संस्थांचे प्रमुख योगदान आहे. कोळसा, संरक्षण, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा आणि पोलाद ही मंत्रालये जीईएम वरील पाच प्रमुख खरेदीदार होती. जवळजवळ 1.63 लाख कोटी रुपयांच्या मागणी मूल्यासह, कोळसा मंत्रालय हे कोळसा सार्वजनिक उपक्रमांद्वारे हाताळणी आणि वाहतूक सेवांसाठी अंदाजे 42,000 कोटी रुपये किमतीच्या 320 हून अधिक उच्च-मूल्याच्या बोलींसह, अव्वल खरेदीदार म्हणून उदयास आले आहे.

निरंतर सुलभीकरण आणि सुधारणांद्वारे, जीईएम पोर्टलने सुरुवातीपासून 11.64 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएमव्ही सह 2.59 कोटींहून अधिक ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात, सरकारी ई-मार्केटप्लेस ने एकाच दिवसात 49,960 ऑर्डरवर प्रक्रिया करून आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे, जी जीईएम परिसंस्थेची अखंड कार्यक्षमता आणि सक्षमता आणि सर्व हितधारकांनी तिचा जलद अवलंब केल्याचे द्योतक आहे.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2095994) Visitor Counter : 21


Read this release in: English , Urdu , Hindi