संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस सर्वेक्षककडून मॉरिशसमध्ये जलक्षेत्र सर्वेक्षण पूर्ण

Posted On: 23 JAN 2025 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025

 

मॉरिशसच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाचा 25,000 चौ. नौटिकल मैलांहून अधिक क्षेत्रफळाचा अंतिम टप्पा आयएनएस सर्वेक्षकने पूर्ण केला आहे. जहाजावर झालेल्या समारंभात, मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त  अनुराग श्रीवास्तव यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल, जी.सी.एस.के. (ग्रँड कमांडर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन) यांना नव्याने तयार केलेली जलविज्ञान सर्वेक्षणाची पक्की प्रत औपचारिकपणे सुपूर्द केली. नव्याने तयार केलेल्या सागरी नकाशामुळे मॉरिशसला त्याच्या सागरी पायाभूत सुविधा, संसाधन व्यवस्थापन आणि किनारी विकास नियोजन विकसित करणे शक्य होईल.  सागरी विकास आणि क्षेत्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि मॉरिशसमधील कायमस्वरूपी भागीदारी या कार्यक्रमातून दिसून आली.

   

परिचालन वचनबद्धतेव्यतिरिक्त, जहाजाने 20 जानेवारी 2025 रोजी संयुक्त भारत-मॉरिशस योग सत्राचे आयोजन केले होते. या सत्रात जहाजावरील चालक दल, राष्ट्रीय तटरक्षक दल, मॉरिशस आणि इंदिरा गांधी भारतीय संस्कृती केंद्राचे कर्मचारी एकत्र आले होते. आयएनएस सर्वेक्षकचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन त्रिभुवन सिंह  यांनी मॉरिशसचे गृहनिर्माण आणि भूमी मंत्री शकील अहमद युसूफ अब्दुल रझाक मोहम्मद यांची भेट घेतली.  त्यांनी भारतीय नौदलाने केलेल्या सर्वेक्षण कार्यांच्या तपशीलांवर चर्चा केली. ही भेट 'सागर' दृष्टिकोनानुरूप  दोन्ही देशांमधील निरंतर वचनबद्धता आणि व्यापक भागीदारीची पुष्टी करते.

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2095568) Visitor Counter : 11


Read this release in: English , Urdu , Hindi