युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी अंदमान निकोबार मधील श्री विजय पुरम येथील भारतीय खेळ प्राधिकरण केंद्राला दिली भेट
Posted On:
22 JAN 2025 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी अंदमान निकोबार मधील श्री विजय पुरम येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी स्थानिक क्रीडा सुविधांचा आढावा घेतला, क्रीडापयोगी संसाधनांची माहिती घेतली आणि क्रीडा क्षेत्रातील इतर विकासाबाबत आवश्यक मुद्द्यांवर चर्चा केली.
क्रीडा क्षेत्रातील स्थानिक प्रगतीचे मूल्यांकन करणे आणि क्रीडापटूंना उत्तम सुविधा आणि प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.रक्षा खडसे यांनी यावेळी क्रीडा संकुल, प्रशिक्षण केंद्र आणि त्यासोबतच तेथील युवा क्रीडापटूंच्या प्रगतीविषयी चर्चा केली. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील नवोन्मेष, क्रीडा विकासाच्या दृष्टीने केलेली प्रगती आणि भविष्यातील योजना यावर देखील त्यांनी संवाद साधला.
अंदमान निकोबार बेटांवर भारतीय क्रीडा प्राधिकरणाची दोन प्रमुख केंद्रे आहेत. यामध्ये ऍथलेटिक्स, सायकलिंग, फुटबॉल, कयाकिंग, कॅनोइंग, रोइंग आणि भारोत्तोलन या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी एकूण १५० पेक्षा जास्त खेळाडूंना उत्तम सुविधा प्रदान केल्या जातात.खडसे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना भारत सरकारच्या विविध योजनांचे महत्व अधोरेखित केले. तसेच 2036 मध्ये ऑलिंपिक क्रीडास्पर्धा भारतामध्ये होण्याची अपेक्षा गृहीत धरत त्यात भारतीय खेळाडूंनी सहभाग घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.
या भेटी दरम्यान भारतीय खेळ प्राधिकरणाच्या सहायक संचालक देबस्मिता बाळ, प्राधिकरणाचे इतर अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक तसेच युवा क्रीडापटू उपस्थित होते.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095262)
Visitor Counter : 13