विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंतराळ अर्थव्यवस्था 8 अब्ज डॉलर झाली असून पुढील दशकात 44 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे- डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 21 JAN 2025 10:07PM by PIB Mumbai


नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025

 

 


केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसद टीव्हीवरील एका विशेष कार्यक्रमात भारताचे बायोफार्मा आणि अंतराळ क्षेत्र आणि शासन यामध्ये भारताची घोडदौड आणि हवामान उपाययोजना या विषयावर राज्यसभा सदस्य विजय तनखा यांच्यासोबत अतिशय सखोल चर्चेत महत्त्वाची माहिती दिली.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कायापालटाला अधोरेखित केले आणि या सर्व सुधारणांचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले, ज्या सुधारणांमुळे हे क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. अंतराळ अर्थव्यवस्था 8 अब्ज डॉलर झाली असून  पुढील दशकात 44 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे ते म्हणाले. संपूर्णपणे स्वदेशी गगनयान मोहीम, आगामी काळात होणारी चांद्रयान-4(2027), शुक्रयान(2028) आणि भारतीय अंतराळ स्थानक(2030) यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांचे टप्पे, भारताच्या भक्कम वाटचालीची कक्षा दर्शवत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्लीत संसद टीव्हीवरील एका विशेष मुलाखतीत बोलताना

त्यांनी स्पेडेक्ससारख्या अंतराळातील उपग्रहांच्या जोडणीची क्षमता प्रदान करणाऱ्या, तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये मोठी झेप घेणाऱ्या मोहिमांच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना दिल्याबद्दल त्यांनी स्टार्ट अप्स आणि एफडीआयची प्रशंसा केली.  मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणजे व्योम मित्रा यंत्रमानव मोहीम असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी बायोमॅन्युफॅक्चरिंग आणि बायो फाऊंड्रीज चौथ्या औद्योगिक क्रांतीला चालना देतील असा दावा केला. “हिमालयापासून किनाऱपट्ट्यांपर्यंत पसरलेल्या विपुल साधनसंपत्तीमुळे भारताची जैव अर्थव्यवस्था विकासाला चालना देणारा कारक घटक समजला गेला आहे. समर्पित जैव-अर्थव्यवस्था असलेल्या पहिल्या काही देशांपैकी एक असलेला भारत या क्षेत्रातील पुनर्चक्रीकरण,उत्पादन आणि स्टार्टअप्समधील जागतिक नवोन्मेषांमध्ये नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.” डॉ. सिंह यांनी नॉलेज पुलिंग, सार्वजनिक-खाजगी सहकार्य आणि स्टार्टअप सहभाग ते शाश्वत वृद्धी यांना सरकारच्या भक्कम पाठबऴाची पुष्टी केली. बायो-ई3 धोरण तयार करणारा भारत हा एक अग्रणी देश असल्याचे त्यांनी नमूद केले.  

डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिक केंद्रित शासनाच्या दिशेने झालेल्या बदलाला अधोरेखित केले. मिशन कर्मयोगीसारखे उपक्रम भूमिका आधारित क्षमता उभारणीला प्राधान्य देऊन नोकरशाहीची नव्याने व्याख्या करत आहेत. चेहरा-ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्रासारखे नवोन्मेष आणि गतिशील ऑनलाईन मॉड्युल्समुळे नागरिकांचे जीवन सुकर झाले आहे. हवामान बदलाचा सामना करण्याची भारताची वचनबद्धता आणि विविध प्रकारच्या हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता यांचा पुनरुच्चार डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला. डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधानांच्या मिशन लाईफ या शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाकडे लक्ष वेधले. त्यांनी प्रतिबंधात्मक आरोग्यनिगा क्षेत्रातील भारताचे नेतृत्व, आरोग्य आणि पर्यावरणीय समस्यांचे निवारण करताना  जागतिक मानकांची पूर्तता यांना देखील अधोरेखित केले.

सहकार्याद्वारे केले जाणारे प्रयत्न, पारदर्शकता आणि नवोन्मेष यांच्या माध्यमातून भारत जागतिक पातळीवर एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे आपला देश स्टार्ट अप्स, व्यवसाय आणि उद्योगांचे केंद्र बनला असून तंत्रज्ञान, शाश्वतता आणि शासन यातील एक नेतृत्वशक्ती म्हणून आपले स्थान भक्कम करत आहे.  

 


 
 

 

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2094967) Visitor Counter : 17


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil